हिंगोली

Bhayandar Crime News : तरुणीला ब्लेडचा धाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न, तरुणीच्या हातावर ब्लेडनेवार

•Bhayandar Sexual Assault News गुन्हे शाखा कक्ष-01 काशिमिरा पोलिसांची कामगिरी ; अंधाराचा फायदा घेऊन तरुणीवर पाठीमागून झडप घालून तिच्यावर अतिप्रसंग करणारे आरोपीला अटक

भाईंदर :- उरण मधील यशस्वी शिंदेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरण सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटत आहे. तसेच,आरोपीचा पोलीसकडून शोध घेतला जात आहे. हे सर्व प्रकरण ताजे असताना भाईंदरच्या काशिमिरा पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 यांनी अंधाराचा फायदा घेऊन तरुणीवर अतिप्रसंग तसेच तिला जखमी करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत महिलांवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न करत होता. 23 जुलै 2024 रोजी रात्री 11.50 दरम्यान फिर्यादी खुशबू प्रदीप सोलंकी या नवघर रोड, साईबाबा नगर, भाईंदर पूर्व येथून कामावरून घरी जात होत्या. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती खुशबू यांचा पाठीमागून पाठलाग करून त्यांना मिठी मारली तसेच, सेक्स करण्याकरिता बळजबरी केली जात होती. ब्लेड चा धाक दाखवून तो त्या महिलेकडे सेक्स मागणी करत होता.

खुशबु हिने आरोपी याला नकार दिला त्यावेळेला तो राग मनात धरून त्याने खुशबूच्या डाव्या हाताला ब्लेड मारून मारहाण केली. यासंदर्भातली तक्रार नवघर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि 2023 चे कलम 74,75,76,118-1,115 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Avinash-Ambure

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरात बलात्काराचे प्रमाण वाढल्याने सर्व पोलीस सतर्क झाले आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याकरिता गुन्हे शाखा कक्ष-1 यांना निर्देश दिले आहे.पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार यांच्यामार्फत आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली असता,पोलिसांना आरोपीबाबत बातमी मिळाली होती.आरोपी हा गणपत पाटील नगर गल्ली नंबर चार, न्यू लिंक रोड,बोरवली पश्चिम या ठिकाणी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी 29 जुलै रात्री 8:00 च्या सुमारास आरोपीच्या घरी जाऊन धाड मारली आरोपीला अटक केली. आरोपीला नाव विचारले असता त्यांनी आपले नाव दीपक गोविंद माळी तसेच तो गायक असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून आरोपीवर पुढील कारवाई करिता नवघर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक राजु तांबे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिप शिंदे, पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा, संतोष लांडगे, सचिन हुले, विजय गायकवाड, सुधीर खोत, विकास राजपुत, पोलीस शिपाई सनी सुर्यवंशी, प्रशांत विसपुते, धिरज मेंगाणे, सौरव इंगळे तसेच पोलीस हवालदार संतोष पाटील, नवनाथ घुगे, सुरज घुनावत, पोलीस शिपाई नवनाथ पवार, संकेत मगर, एम.एस.एफ.कुणाल हिवाळे सर्व नेमणुक नवघर पोलीस ठाणे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास नवघर पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0