Beed Crime News : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मोठी कारवाई ; तलाठी पिंपळगाव घाट बीड यांना 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक
•सातबारा वर मालकी हक्कात नोंद करण्यासाठी तलाठी येणे 17 हजाराची लाच मागितली होती
बीड :- दिलीप विष्णू कन्हेरकर (34 वर्ष) तलाठी सज्जा पिंपळगाव घाट बीड आणि त्याच्या साथीदार दिगंबर लक्ष्मण गात (67 वर्ष) यांना पंधरा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सातबारा वरील मालकी हक्काचे नाव नोंदवण्याकरिता मागितली होती लाच. यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडिलांच्या नावे मौजे पिंपळगाव घाट येथील शेत गट 664,676,669,681, 683, 684, 685, 687 मधील शेतजमीन वाटणी पत्रा आधारे तक्रारदार यांचे व त्यांचे भाऊ गणेश नाईकवाडे यांचे नावे खाते फोड आधारे 100 रु. चे बॅांडवर वाटनीपत्र केले होते वाटणीपत्रा आधारे तक्रारदार व त्यांचा भाऊ यांची 7/12 ला मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी पिंपळगावचे तलाठी श्री कनेरकर यांची भेट घेतली असता त्यांनी सदर काम करुण देण्यासाठी 17000 रुपयाची लाच मागितली. Beed Crime News
तक्रारदार यांना तलाठी कनेरकर मागणी करत असलेली लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि. बीड येथे तक्रार दिल्यावरुण आज रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक तलाठी दिलीप विष्णू कनेरकर यांनी तक्रारदार यांना त्यांचे प्रलंबित काम करण्यासाठी 17000/- रू. लाचेची मागणी करून तडजोड अंती 15000/- रू. स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम 15000/- रू. खाजगी मदतनीस दिगंबर गात यांचे मार्फतीने स्विकारण्याचे मान्य केले त्यावरुन तलाठी कनेरकर यांचे चौसाळा येथील सुलतानपुर रोड वरील खाजगी कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता खाजगी ईसम दिगंबर गात यांनी तलाठी यांचे सांगणेवरुन पंचासमक्ष15000रु लाच स्वीकारली असता खाजगी ईसम दिगंबर गात यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले तसेच लागलीच तलाठी कनेरकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे नेकनूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. Beed Crime News
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि .बीड सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, भरत गारदे, संतोष राठोड, गणेश मेहेत्रे, स्नेहलकुमार कोरडे ला. प्र. वि.बीड. Beed Crime News