Mumbai Suicide News : गेट ऑफ इंडिया जवळ असलेल्या समुद्रात उडी मारून हिरे व्यापाराची आत्महत्या
•Mumbai Suicide News महिनाभरात समुद्रात उडी मारून आत्महत्या झाल्याचे तिसरी घटना
मुंबई :- 15 जुलै रोजी अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीने मरीन ड्राईव्ह येथे समुद्र जोडी मारून आपल्या जीवन यात्रा संपवली होती. ममता कदम आत्महत्या घडल्यानंतर पोलिसांना त्याची बॅग सापडले त्या बॅगेत ओळखपत्र मोबाईल फोन पोलिसांना आढळून आले होते.प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा पोलिसांचा संशय होता. तरुणीही आयटी इंजिनिअर असून ती एका नामांकित कंपनीत नोकरीला होती. या घटनेनंतर मुंबईच्या वरळी सी-लिंग वरून एका व्यापाऱ्याने उडी मारून आपले जीवन यात्रा संपवली होती. सर्व घटना ताज्या असताना महिनाभरात तिसरी घटना समोर आली आहे.
व्यवसायात नुकसान झाल्यामुळे मुंबईतील एका हिरे व्यापाऱ्याने गेट वे ऑफ इंडिया लगत अरबी समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. ही घटना आज सोमवारी उजेडात आली.पोलिसांच्या माहितीनुसार, संजय शहा (65 वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते हिरे व्यापारी होते. पण गत काही महिन्यांपासून त्यांना व्यवसायात तोटा झाल्यामुळे ते तणावात होते. या तणावातूनच त्यांनी रविवारी (21 जुलै) रोजी गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. तसेच खबरदारी म्हणून पोलिसांनी मरीन ड्राईव्ह परिसरात बॅरिकेट्सही लावले आहेत. तसेच गस्तही वाढवली आहे.
तसेच,उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच वरळी सी – लिंकवरून भावेश सेठ नामक व्यावसायिकानेही कर्जबाजारीपणाला कंटाळून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी भावेश सेठ यांनी आपल्या मुलाला फोन करून त्याची कल्पना दिली होती. पोलिसांना त्यांच्या गाडीत सुसाइड नोटही मिळाली होती.