Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभवानंतर शेकापाची जयंत पाटील यांचे पत्रकार परिषद, घोडेबाजार झाल्याचा आरोप
Vidhan Parishad Election Result 2024 : पराभवाच्या आत्मचिंतन करू आम्ही थोडे बेसावध राहिलो, जयंत पाटील
मुंबई :- विधान परिषदेच्या Vidhan Parishad Election Result 2024 11 जागेचा निकालानंतर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले शेकापाचे नेते जयंत पाटील Jayant Patil यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये संवाद करताना ते म्हणाले की, निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला आहे. शरद पवार गटाचे एक मतदान फुटले असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आमदारकी हारलो म्हणून काम सोडणार नाही असेही ते म्हणाले.आमचे कार्यकर्ते कधी नाराज होत नाहीत. पुढची भूमिका हीच असेल की आम्ही महाविकास आघाडी आणि शरद पवारांसोबत आहोत. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. एका पराभवाने नाराज होणारे आमचे कार्यकते नाही. चार आमदार गेले म्हणून पक्षाचे धोरण बदलते असे होतच नाही. आमची ताकद आम्हाला माहित आहे. एक निवडणूक हरलो म्हणून आमचे काम थांबत नाही”, असे जयंत पाटील म्हणाले. Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024
विधान परिषदेच्या निकालावर जयंत पाटील यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. ” या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला आहे. आम्ही पराभवाचे आत्मचिंतन करत आहोत. हरलो म्हणून फरक पडत नाही आम्ही पुन्हा लढू. पण राज्याच्या राजकारणात असे कधीच होत नव्हते. पूर्वी थोड्या फार प्रमाणात लोक इकडे तिकडे जायचे. मी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. मात्र आताची परिस्थिती पाहता जनतेनेही आता विचार करण्याची गरज आहे”, असे जयंत पाटील म्हणाले.
काँग्रेसने जयंत पाटील यांचा पराभव केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले, “काँग्रेसने काही केले नाही. मात्र मतदारांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. त्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ काही करू शकले नाही. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. लोकसभेत देखील पैशांचा वापर झाला. याबाबत आत्मचिंतन करत आहोत. आम्ही थोडे बेसावध राहिलो”, असे जयंत पाटील म्हणाले. Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024
काँग्रेसने दुसऱ्या पसंतीची मते समान वाटायला हवी होती पुढे जयंत पाटील म्हणालेत की, “मी शरद पवार गटाच्या बारा मतांवर निवडणुकीत उभा होतो. त्यामध्ये शरद पवार गटाचे एक मत फुटले. आमचीही मते फुटली. मला 4 मते मिळाली असती तर दुसऱ्या पसंतीत मी 25 ते 30 जास्त मते घेऊन जिंकलो असतो. हे असेच गणित होते. काँग्रेसने जर दुसऱ्या पसंतीची मते समान वाटली असती तर निकाल योग्य लागला असता. मात्र हे गणित बदलले आहे. मलाही याचा पूर्ण अभ्यास नाही. मलाही अभ्यास करावा लागेल. मतदान केंद्रातून मी बाहेर पडलो. बरेच कार्यकर्ते माझ्यकडे निकालासाठी आले होते. याबाबत मी नंतर पुन्हा बोलेन”, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.