मुंबई

Panvel News : पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन केल्या या मागण्या

•पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत रोजगारा करिता स्थानिकांना प्राधान्य द्यावे ठाकरे गटाची मागणी

पनवेल :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि पालिका आयुक्त यांना पनवेल महानगरपालिकेबाबत निर्माण झालेल्या समस्या विविध मुद्द्यांबाबत पालिका आयुक्तांना ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले आहे.आज (10 जुलै ) प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या समस्येबाबत पनवेल महानगर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी भेट घेऊन, पनवेल महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रातील नोकर भरती बाबत, महानगरपालिका, मेट्रो, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, साफसफाई कामगार,पाणी पुरवठा विभाग यांची सांगड झालेली असून, स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलण्यात आलेले आहे.तसेच महानगरपालिका क्षेत्रात नोकर भरती करताना बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा विनिमय करणे आवश्यक असल्याने व तसेच पाऊस चालू झाल्या रस्त्यांना खड्डे पडल्याने प्रवासात वाहन चालविताना नाहक त्रास सहन करायला लागतो, चेंबर जाम होणे, तलाव ओव्हरफ्लो, सांडपाणी, लाईट येणे-जाणे या समस्याबाबत तसेच पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या ठेकेदारांच्या मार्फत कामे पूर्ण केली जातात त्यामुळे छोटे प्रकल्पग्रस्त ठेकेदार रोजगारांपासून वंचित राहतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत गरजू व बेरोजगार नागरिकांना सवलतीपूर्वक व्यवसाय करण्याकरिता टेम्पो उपलब्ध करून रोजगार निर्मिती केली असता पनवेल महानगरपपालिकेचे वार्ड अधिकारी त्यांना व्यवसाय करू देत नाहीत. या समस्यांकरिता एक समन्वय बैठक चर्चेसाठी बोलविण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले.

उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपमहानगर संघटक सुनीत पाटील, शहरप्रमुख प्रवीण जाधव, गुरुनाथ पाटील, सूर्यकांत म्हसकर, यतीन देशमुख, युवासेना सहसचिव अवचित राऊत, माजी सरपंच करवले लहू पाटील, शिवसैनिक प्रशांत अनगुडे, सुनील पाटील, दिलीप पाटील, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0