Mira Road Crime News : हॅलो, कुरिअर वाला बोलतोय!”… अनोळखी कॉलने खातं रिकामं – पण सायबर पोलिसांची ‘ऑपरेशन रिकव्हरी’ यशस्वी!

• 96 हजारांची लुट ऑनलाईन कुरिअरच्या बहाण्याने; ‘फक्त एक लिंक’ पाठवली आणि तक्रारदाराचा मोबाईल बनला फसवणुकीचं शस्त्र!
मिरा रोड :- “तुमचं कुरिअर अडलंय, पत्ता चुकीचा आहे…” – असं सांगणाऱ्या एका अनोळखी फोनने मिरारोड येथील गृहिणी जैन यांच्या आयुष्यात आर्थिक थरार उभा केला. केवळ एका क्लिकमुळे 96 हजार रुपयांची लूट झाली, पण सायबर पोलिसांच्या धडाडीने संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात यश आलं!
काही सेकंदातच त्यांचा मोबाईल सायबर फसवणुकीचं साधन बनला. एका अज्ञात लिंकवरून ॲप डाऊनलोड केल्याने 26 हजार तात्काळ वळते झाले, आणि उरलेली रक्कमही धोक्यात होती.
सायबर पोलिसांनी तात्काळ NCCRP पोर्टलवर गुन्ह्याची नोंद केली. तपासात निष्पन्न झालं की पैसे एका E-Commerce प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आले होते. पोलिसांनी त्या कंपनीशी संपर्क साधत व्यवहार रोखले आणि संपूर्णपणे 96 हजारांची ची रक्कम परत मिळवली!
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ,प्रसाद शेनोळकर, वैभव धनवडे,अमिना पठाण, स्नेहल पुणे,कुणाल सावळे, माधुरी धिंडे, सावन शेवाळे या सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे आणि सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केली.


