मुंबईक्राईम न्यूज

Fake Police Scam : स्वस्तात सोनं घेण्याची हाव भोवली : गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून 13 लाखांची ‘लूट’

•नवी मुंबई ; दिवसाढवळ्या दरोडा पोलीस असल्याचे सांगून जबरदस्तीने कारमध्ये बसविले, मारहाण करून 13 लाखाची लूट… (Fake Police)

नवी मुंबई :- 26 जून रोजी स्वर्गीय रामशेठ ठाकूर वाचनालय समोर असलेल्या फुटपाटावर खारघर नवी मुंबई (Kharghar Navi Mumbai) या ठिकाणी स्वस्त दरात सोन्याचे बिस्किट खरेदी करण्यासाठी उभे असलेले राज पटेल यांना पोलीस असल्याचे सांगून त्यांना जबर मारहाण करून जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांच्या जवळील 13 लाख रुपयांचे कॅश जबरदस्तीने काढून त्यांना मारहाण केली होती.याची तक्रार राज पटेल यांनी खारघर पोलीस ठाण्यात दिली(Kharghar Police Station) होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 395,323,504,506,170,120 (ब) अन्वये गुन्हा दाखल केला होता. Navi Mumbai Crime News

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध

सहाय्यक पोलीस आयुक्त,अजय कुमार लांडगे यांनी गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह घटनास्थळीची पाहणी करुन गुन्हा करण्यासाठी आलेले आरोपी गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळ वरून निघून जाणारे आरोपी यांचे शोध घेण्याकरण्याकरिता गुन्हे मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकारी अंमलदार यांचे तीन पथके तयार केले होते. दोन दिवस तांत्रिक तपास करून संशयित व्यक्ती तसेच बनावट नंबर प्लेट गुन्हा करून जाताना दिसले. आरोपी हे घटनास्थळी कसे आले याची माहिती काढली असता ते आरोपी ईरटीका कार व्यतिरिक्त दोन मोटरसायकलवर आलेले दिसले याच्या आधारे पोलिसांना एक पांढरा मोटरसायकलचा नंबर प्राप्त झाला. घटनास्थळीवर संकलित केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हा आठ ते दहा आरोपींनी केल्याच्या पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मध्यवर्ती कक्षाचे तीन पथकाद्वारे एकाच वेळी सात सराईत आरोपींना डोंबिवली, नवी मुंबई आणि कल्याण येथे छापेमारी करून ताब्यात घेतले या सात आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी एकूण बारा लाख 27 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत केले आहे. Navi Mumbai Crime News

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे

1) राज उर्फ मोहमंद आसिफ मोहमंद गालिब शेख (40 वर्ष) धंदा चालक राह. सम्राट मित्र मंडळ, संदेश नगर, बैल बाजार कुर्ला, मुंबई

2) विशाल बाजीराव तुपे (21 वर्ष) धंदा बजाज रिकव्हरी राह. ओमसाई निवास म्हात्रे नगर रूम नं. 401 घनसोली गाव नवी मुंबई.

3) रोहीत राजाराम शेलार (26 वर्ष) धंदा-चालक, राह. ओमसाई निवास म्हात्रे नगर रूम नं. 401 घनसोली गाव नवी मुंबई मुळ

4) निलेश बाळू बनगे (36 वर्ष) धंदा मजूरी राह. रूम नं. 1 पार्वती निवास शिवसेना शाखे जवळ से. 19 कोपरखैरणे नवी मुंबई

5) शिवाजी मारूती चिकणे (40 वर्ष)राह. रूम नं. १, पार्वती निवास शिवसेना शाखे जवळ से.१९ कोपरखैरणे नवी मुंबई

6) विशाल गणपत चोरगे (36 वर्ष)राह. सिध्दीविनायक पुजा प्लॉट नं. १३/१४ डि मार्ट जवळ, घनसोली

7) दिलेर साजीद खान (46 वर्ष) राह. रूम नं. ०७ हानी बेना चाळ झरीमरी कुर्ला, अंधेरी मुंबई

सराईत आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

यामधील सहा आरोपी हे मूळचे साताऱ्याचे राहणारे असून विशाल तुपे याच्यावर मुंबई ठाणे येथे पाच गुन्हे दाखल आहे,असीफ शेख उर्फ खान याच्यावर नवी मुंबईच्या हद्दीत तीन गुन्हे दाखल आहे,शिवाजी चिकणे याच्यावर मुंबई नवी मुंबई येथे दोन गुन्हे दाखल आहेत.रोहीत शेलार याच्यावरही नवी मुंबई येथे दोन गुन्हे दाखल असून हे साथी आरोपी सराईत गुन्हेगार असून चोरीसारखे गंभीर गुन्हे यांनी केले आहे. Navi Mumbai Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल कदम,श्रीनिवास तुंगेनवार,सतिश भोसले, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, पोलीस हवालदार नितीन जगताप, महेश पाटील, पोलीस नाईक सचिन टिके, पोलीस हवालदार अनिल यादव, शशिकांत शेंडगे पोलीस नाईक निलेश किंद्रे, महेश अहिरे, पोलीस हवालदार संजय राणे पोलीस नाईक सतिश चव्हाण, पोलीस शिपाई अशोक पाईकराव, नितीन पोरडवार जगदीश तांडेल, तांत्रिक विश्लेषण शाखा तसेच सीसीटीव्ही कमांड महिला पोलीस हवालदार मंगल गायकवाड, महिला पोलीस शिपाई स्नेहल जगदाळे नवी मुंबई यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले करीत आहेत.

असा झाला तोतया पोलिसांचा पर्दाफाश ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0