मुंबई

Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

•वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे नेते वसंत मोरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर, 9 जुलैला शिवसेनेत प्रवेश करणार, प्रकाश आंबेडकरांना करणार जय भीम..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नगरसेवक आक्रमक नेतृत्व असलेले वसंत (तात्या) मोरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय महाराष्ट्र केला त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करत पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. वसंत मोरे हे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेस नेते आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी लढत होती या निवडणुकीत वसंत मोरे यांना अतिशय कमी मतदान झाले होते. आज वसंत मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. 9 जुलैला वसंत मोरे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आजच्या भेटीनंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना जयभीम केल्याचे दिसून येत आहे लवकरच ते पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेला आता पुन्हा शिवसेनेकडून संधी मिळणार का? पुण्यातील राजकीय गणित बदलणार का? असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमाची काय म्हणाले?
“मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो. माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतोय”, असंदेखील वसंत मोरे यावेळी म्हणाले. “आगामी महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शिवसेनेकडून कडवं आव्हान देऊ”, असंदेखील वसंत मोरे म्हणाले. वसंत मोरे यांना उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं. मी उशीर केला असं ते म्हणाले”, अशी प्रतिक्रिया दिली.आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातून कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. “मला दोन पर्याय आहेत. खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून लढू शकतो”, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. “पुणे शहरात माझं मतदान नव्हतं. माझा तो भाग नव्हता. तरीही मला लोकसभेत चांगली मते मिळाली”, असा दावा वसंत मोरे यांनी केला. “माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहणार. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे. 10 नगरसेवक आहेत. बाहेर त्यांची ताकद आहे”, असं वसंत मोरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0