Pune Crime News : एक वर्षापुर्वी चे भांडणाचा राग मनात धरून मित्रांचे मदतीने कट रचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
आरोपीना बिबवेवाडी पोलीसांनी शिरवळ येथे पाठलाग करून केली अटक
पुणे :- (21 फेब्रुवारी) रोजी रात्रौ 8.20 वा. सुमारास फिर्यादी यांच्या परिचय असलेले व्यक्ती ओंकार थोरात (रा. जांभुळवाडी कात्रज पुणे,) चिक्या लोखंडे ,धनकवडी पुणे व त्यांचे आणखी दोन साथीदार यांनी फिर्यादी यांचेशी झालेल्या जुन्या भांडणाचे कारणावरून व फिर्यादी प्रविण बनसोडे यास मोठा भाऊ मानत असून त्याचे सोबत सतत असल्याने त्यांनी हातामध्ये लोखंडी धारदार हत्यारे घेवून प्रविण अशोक बनसोडे हा दुकानातून बाहेर आला असता चिक्या लोखंडे हा प्रविण बनसोडे याचेकडे बघून धरधर असे बोलून शिवीगाळ करू लागला त्यावेळी प्रविण बनसोडे त्यांना पाहून मागेच सिध्दार्थनगर मध्ये पळत गेला असता त्याचे मागे ओंकार थोरात, चिक्या लोखंडे व त्यांचे आणखी दोन साथीदार यांनी पळत जावून प्रविण अशोक बनसोडे यास सिध्दार्थनगर येथील बुध्दविहाराचे समोर पकडून त्याचौघांनी त्यांचे हातातील लोखंडी धारदार हत्यारांनी प्रविण बनसोडे याचे डोक्यात मागील बाजुस, मानेवर, उजवे हाताचे दंडावर, उजवे हाताचे बोटावर व दोन्ही पायांचे पंजावर वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व सदर मदतीसाठी आलेल्या लोकांचे दिशेने हत्यारे फिरवून दहशत केली म्हणून फिर्यादी यांनी ओंकार थोरात रा. जांभुळवाडी कात्रज पुणे, चिक्या लोखंडे रा. धनकवडी पुणे व त्यांचे आणखी दोन साथीदार यांचेविरूध्द तक्रार दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे. Pune Crime News
दाखल गुन्हयातील आरोपींचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, तपास पथकातील स्टाफ असे मा. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोपीचा शोध घेत असताना वरील नमुद आरोपी यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण व्दारे व गुप्त बातमीदामार्फत मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील आरोपी हे ॲग्रो प्युअर नॅचरल फुड कंपनी गाव विंग ता. खंडाळा, जि. सातारा येथे असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकातील आधिकारी पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व अमंलदार शिवाजी येवले, आशिष गायकवाड व विशाल जाधव यांनी आरोपी नावे 1) शुभम ऊर्फ चिक्या भास्कर लोखंडे, (20 वर्षे) रा. म्हस्के चाळ, शेवटचा बसस्टॉप जवळ, धनकवडी पुणे, मुळगांव श्री सिध्दनाथ मंदिर समोर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा 2) सुरज नितीन क्षिरसागर, (20 वर्षे) रा. लक्ष्मी नगर गजाजन महाराज मठ समोर दत्तवाडी पुणे. Pune Crime News
मुळगांव मु.पो. पारगांव, खंडाळा, जि. सातारा 3) तौकिर रफिक शेख, (20 वर्षे) रा. मक्का मस्जिद बाजुला, गल्ली नं.०१, नवाजीत चौक कोंढवा पुणे एक ज्युएनाईल आरोपी यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करता ओंकार थोरात याचे दाखल गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांनी हाताचा अंगठा तोडल्याचे कारणावरून त्याचा बदला घेण्यांचे उद्देशाने जखमीवर लोखंडी हत्याराने वार करून गंभीर जखमी केलेचे निष्पन्न झाल्याने ओंकार महेश थोरात (24 वर्ष) निपाणं वस्ती कात्रज पुणे यास सदर गुन्हयात अटक करून त्यांचेकडून एक लोखंडी पालघन व एक लोखंडी कोयता, दोन मोटर सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Pune Crime News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलीस उप आयुक्त आर राजा, परिमंडळ 5 पुणे शहर व सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संजय निकुंभ, पोलीस हवालदार, संतोष जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, विशाल जाधव, प्रणव पाटील, अभिषेक धुमाळ, ज्योतिष काळे यांनी केली आहे. Pune Crime News