Virar Crime News : नवजात बालकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्यास उघडयावर टाकुन आरोपी फरार
आरोपीचा शोध घेवून, 24 तासाचे आत गुन्हा उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
विरार :- पोलीस ठाणे हद्दीत 26 फेब्रुवारी 2024 रोजी 7.15 सुमारास यातील तक्रारदार हे पायी चालत जात असतांना, त्यांस सिध्दी इलेक्ट्रीक, शॉप नं.८, प्रिन्स अपार्टमेंट, जिवदानी रोड, विरार (पु.), ता.वसई, जि. पालघर येथील मोटर गैरजचे समोरील लोखंडी पेटीवर एक स्त्री जातीचे नवजात बालकाची जन्मतःच त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कोणीतरी अनोळखी इसमाने उघडयावर टाकुन दिले बाबत माहिती दिली होती. तक्रारदार सचिन राऊळ (38 वर्षे) रा कारगिल नगर, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व, ता. वसई यांचे तक्रारीवरुन विरार पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. भा.दं. वि.सं.कलम 314 प्रमाणे 26 फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. Virar Crime News
गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांनुसार विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी लगेच घटनास्थळी भेट देवून, घटनास्थळी मिळालेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजचे सुक्ष्म निरीक्षण केले असता त्यामध्ये दोन महिला सदरचा गुन्हा करतांना दिसुन आल्या होत्या. त्या अनुषंगाने अंदाजे 2 ते 3 कि.मी. पर्यंतचा एरिया डॉमिनेशन करुन त्या भागातील राहणाऱ्या लोकवस्तीवर लक्ष केंद्रित करुन एका घरातील व्यक्तीवर संशय बळावल्याने त्यांना विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्हा अवघ्या 24 तासाचे आत उघडकीस आणलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राम कुंडगिर हे करत आहेत. Virar Crime News
पोलीस पथक
सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडल-3 विरार, रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, संदिप शेरमाळे, पोलीस अंमलदार संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. Virar Crime News