Jitendra Awhad : ड्रग्ज नेमके येथे कुठून; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
•गुजरातच्या किनाऱ्यावर ड्रग्ज का आणि कसे येतं, आमदार जितेंद्र आव्हाड
मुंबई :-पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चार हजार कोटीचे ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर भेटले होते त्यानंतर विरोधकांनी चांगला समाचार पुण्याचा उडता पंजाब होत असल्याचे सांगितले आहे. या सर्व घडामोडी वर जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. Jitendra Awhad
आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
व्हायब्रंट गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्यावरून सुमारे 3300 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. ही आतापर्यंतची ड्रग्ज जप्तीची सर्वांत मोठी कारवाई आहे. यापूर्वी 2021 मध्ये ‘एनआयए’ या तपाससंस्थेनं मुंद्रा बेटावरून जवळपास 21 हजार कोटी रुपयांचं तीन हजार किलो ड्रग्ज जप्त केलं होतं. त्यापूर्वी हे प्रकार सुरू होते आणि 2021 नंतरही सुरूच आहेत. Jitendra Awhad
आश्चर्याची बाब म्हणजे भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी या ऑपरेशनसाठी सुरक्षा एजन्सींचं कौतुक करताना स्वत:ची पण पाठ थोपटून घेतली आहे. देशभक्त मंडळीसुद्धा टाळ्या पिटण्यात दंग आहेत. पण वारंवार एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गुजरातच्याच किना-यावर का आणि कसं येतं याविषयी कुणीही प्रश्न विचारला नाही. Jitendra Awhad
मी इथे एक इमेज जोडलेली आहे. त्यामध्ये 2021 साली करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ड्रग्ज नेमकं कुठून येतं त्या देशांची नावं आहेत. त्यामध्ये इराण, पाकिस्तान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. भाजप व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाचं सरकार सत्तेत असतं तर आत्तापर्यत भाजपने संपूर्ण सरकारला देशद्रोही ठरवून ठणाणा केला असता. पण गुजरातमध्ये गेली दोन दशकं कुणाचं सरकार आहे, हे वेगळं सांगायला नको. वारंवार जर गुजरातच्या किना-यावर अमली पदार्थ सापडत असतील तर हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? Jitendra Awhad
15 सप्टेंबर 2021 रोजी 3000 किलो अमली पदार्थ अदानींच्या मुंद्रा बंदरावरुन पकडलं गेलं होतं. जुलै 2022 मध्ये मुंद्रा बंदरावरुन पुन्हा एकदा एका कंटेनरमध्ये 376 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ आढळून आले होते. अलीकडेच महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि दिल्लीमध्येही अमली पदार्थ जप्त करण्यात आले. बंदरावरून हे अमली पदार्थ लहान-मोठ्या शहरांमध्ये केव्हाच पोहोचले आहेत, पण देश सध्या एका वेळ्याच नशेत आहे. Jitendra Awhad