Wadala Truck Terminal Police : घरफोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी केले गजाआड

Wadala truck Terminal Police Latest News : नजिमुल हक ईसाक शेख,अरबाज अली मोहसीन मलीक,नागेश नित्या देवेंद्र,सत्या रविचंद्र देवेंद्र,अंकित महेश गुप्ता असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुंबई :- घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी अटक केली आहे. Wadala Truck Terminal Police पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात या पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.नजिमुल हक ईसाक शेख,अरबाज अली मोहसीन मलीक,नागेश नित्या देवेंद्र,सत्या रविचंद्र देवेंद्र,अंकित महेश गुप्ता असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी हे दिवसा आणि रात्री घरफोडी करीत असे.




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नजिमुल हक ईसाक शेख, (वय 23) याच्याविरुद्ध वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरामध्ये दोन घरफोडीचे गुन्हे दाखल असून घरफोडीच्या दरम्यान आरोपीने पहिला प्रकरणात साडेनऊ हजार रुपयांची चोरी केली होती. त्यातील पोलिसांनी सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपीच्या विरोधात दोन ते चार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दुसऱ्या प्रकरणात आरोपीच्या विरोधात तीन लाख 80 हजार रुपये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरल्याची तक्रार दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीला अटक करून दुसऱ्या प्रकरणातील चोरीच्या एक लाख मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत गेला असून मूळचा आरोपी हा पश्चिम बंगालचा असल्याचे पोलिसांच्या तपासात सांगण्यात आले आहे.
आरोपी अरबाज अली मोहसीन मलीक (वय 26) याने पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरामध्ये सहा लाख 69 हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल चोरीला केला होता. त्या प्रकरणी आरोपीला बेहराम पाडा, बांद्रा, मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. तो सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्याच्याकडून एकुण 4 लाख 33 हजार रूपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून उर्वरीत मालमत्तेबाबत आरोपीकडे तपास सुरू आहे. आरोपींवर मुंबई शहर अंतर्गत प्रत्येकी 2 ते 4 गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नागेश नित्या देवेंद्र (वय 22),सत्या रविचंद्र देवेंद्र (वय 24) आणि अंकित महेश गुप्ता (वय 25) या तीन आरोपींना चोरीच्या प्रकरणात अटक केली असून तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्याच्याकडून एकुण 15 हजार रूपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींवर मुंबई शहर अंतर्गत प्रत्येकी 8 ते 10 गुन्हे दाखल आहेत.