Virar Police News : गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात; विरार पोलिसांच्या गुन्हे कक्ष-3 शाखेची कारवाई
Virar Anrnala Police Busted Gavathi Daru Adda : अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळंब ग्रामपंचायत हद्दीतील वासुदेव बुवा नगर येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विरार :- अर्नाळा सागरी पोलीस Virar Anrnala Police ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळंब ग्रामपंचायत हद्दीतील वासुदेव बुवा नगर येथील शेतीमध्ये टेम्पररी शेडमध्ये सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Busted Gavathi Daru Adda अर्नाळा सागरी पोलिसांच्या गुन्हे कक्ष-3 शाखेनी ही कारवाई केली आहे.राजेंद्र यशवंत किती (वय-58, रा.वासुदेव बुवा नगर, कळंब,ता वसई जि.पालघर) असे गुन्हे शाखेनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. Virar Latest Crime News
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या आधिक माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट 3 चे पथक अर्नाळा सागरी ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळंब ग्रामपंचायत हद्दीत गस्त घालत असताना त्यांना याबाबतची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार वासुदेव बुवा नगर येथील शेतीमध्ये टेम्पररी शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकला असता राजेंद्र किणी हा भट्टी लावून दारू काढत असल्याचे दिसून आले.त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. Virar Latest Crime News
पोलिसांनी यावेळी केलेल्या कारवाईमध्ये रामभोला राजेंद्र याच्या ताब्यात पाच हजार लीटर कच्चे रसायन (गुळ, नवसागर, तुरटी मिश्रित), 280 लीटर दारू असा एकूण 2 लाख 41 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ब)(क)(फ)(ई)अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. Virar Latest Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, युवराज वाघमोडे, सुनिल पाटील, अतिष पवार, मनोहर तारडे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, यांनी केले आहे. Virar Latest Crime News