क्रीडा

Ind vs Eng 4th Test Match : टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर, इशान किशनला संधी?

•पंतला सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला; दुखापतग्रस्त पायातून रक्तस्त्राव, मैदानावरच रुग्णवाहिका बोलावली!

Ind vs Eng 4th test match :- इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा उपकर्णधार आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे या निर्णायक कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. डॉक्टरांनी त्याला तब्बल सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या जागी संघात इशान किशनला 15 सदस्यीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा प्रसंग सामन्याच्या 68 व्या षटकात घडला. ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करत असताना फुल टॉस चेंडू ऋषभ पंतच्या उजव्या बुटावर जोरदार आदळला. पंतने बूट काढला असता, त्याच्या पायातून रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास आले. काही वेळातच त्याच्या पायावर सूजही दिसू लागली आणि त्याला उभे राहणेही कठीण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, मैदानावर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि पंतला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्याला सहा आठवड्यांच्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

या दुखापतीमुळे पंत चौथ्या कसोटीत फलंदाजी करू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहे, मात्र नियमांनुसार त्याला फलंदाजीची परवानगी नसेल. यामुळे टीम इंडियाची फलंदाजी आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.

सामन्याचा विचार करता, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून यशस्वी जयस्वाल (58) आणि केएल राहुल (46) यांनी 94 धावांची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, त्यानंतर शुभमन गिल (12) लवकर बाद झाला. साई सुदर्शनने 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दिवसाखेर रवींद्र जडेजा 19 आणि शार्दुल ठाकूर 19 धावांवर खेळत आहेत. पंतच्या या दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढवली असून, आता उर्वरित फलंदाजांवर मोठी जबाबदारी आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0