मुंबई

Virar Crime News : विरारमध्ये ‘दुचाकी दहा हातां’चा पर्दाफाश!

बोळींज पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दोन सराईत चोर व दोन अल्पवयीन मुलांकडून 4 गुन्ह्यांचा उलगडा

विरार (प.) | पालघर जिल्ह्यातील बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुचाकी चोरणाऱ्या टोळीवर अचूक निशाणा साधत धडाकेबाज कारवाई केली आहे. चार गुन्ह्यांचा उलगडा करत, दोन सराईत आरोपी व दोन अल्पवयीन चोरट्यांकडून तब्बल 1 लाख रुपयांच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. यामागे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाची झपाटलेली कार्यवाही असल्याचे समोर आले आहे.

सीसीटीव्ही’ ते ‘क्लोझिंग ट्रॅप’ – अशी पकडले चोरटे!
विरार पश्चिममधील विष्णु पार्क व चिखलडोंगरी रोड येथून चॉकलेटी रंगाची टीव्हीएस ज्युपिटर आणि काळ्या रंगाची (NTORQ 125 RACE XP) स्कुटी चोरीला गेल्याची तक्रार अनुक्रमे 14 व 16 जून 2028 रोजी नोंदविण्यात आली होती. चोरीची साखळी थांबवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्यानंतर,पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश सावंत व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक किरण वंजारी, यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाला वेग दिला.यांनी घटनास्थळांची पाहणी करून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चोखपणे तपासले. संशयितांची हालचाल टिपून गुप्त बातमीदारांद्वारे मिळालेल्या माहितीतून अनुराग सुंदरम आणि मान्तेश कोळी या दोन सराईत चोरट्यांना 20 जून रोजी विरार पश्चिम परिसरातून जेरबंद करण्यात आले.

“चोरांचा पत्ता लागला… आणि पोलीस वाघासारखे झडपले!”

अटक केलेल्या आरोपींकडून चौकशी करत असताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या, तर तपासादरम्यान दोन अल्पवयीन आरोपींचा सहभागही उघड झाला. त्यांच्याकडून आणखी एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.एकूण 4 गुन्हे उघड होत, सर्व 100 टक्के मुद्देमाल वसूल करण्यात आला असून यामध्ये अंदाजे 1 लाख रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींवर भा.दं.वि. कलम 303 (2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि., दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मि.भा.य.वि.,जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, विरार, विजय लगारे, सहायक पोलीस आयुक्त, नालासोपारा, यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश कावळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बोळींज पोलीस ठाणे, प्रकाश सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक किरण वंजारी, पोलीस उप निरीक्षक विष्णू वाघमोडे, सहाय्यक फौजदार जनार्दन मते, किशोर धनु, पोलीस हवालदार रोशन पुरकर, प्रफुल सरगर, पोलीस अंमलदार संदिप शेळके, सुखराम गडाख, कर्मचारी/सागर देशमुख यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0