Virar Crime News :वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश अलवयीन मुलीची 2 महिलांची सुटका
Virar Crime News : – वेश्याव्यवसायकरीता अल्पवयीन मुली पुरविण्यास आलेल्या महिला वेश्यादलालावर करवाई करुन 01 अल्पवयीन च 02 प्रौढ पिडित मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिचंध कक्ष भाईंदर पथकास यश.
विरार :- (28 एप्रिल) रोजी बातमीदारकडून महिला दलाल नावे नगमा खान हि वेश्याव्यवसाय करीत असुन ती व्हॉटॲपव्दारे पुरुष गिन्हाईकांना अल्पवयीन व प्रौढ मुलींचे फोटो पाठवुन, वेश्याकामाकरीता अल्पवयीन व प्रौढ मुली पुरवीते, अशी गोपनीय माहिती मिळाली. Virar Crime News
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींची पुर्तता करुन बोगस गिन्हाईक व दोन पंच बोलावून महिला वेश्यादलाल नजमा उर्फ जसप्रित उर्फ नीलम सांशी हिने सांगितल्याप्रमाणे ॲक्वा फॅमिली रेस्ट्रो बार, निरा कॉम्पलेक्स, न्यु गोल्डन नेस्ट, भाईंदर पूर्व, ता.जि.ठाणे या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळून 02.00 वा. छापा टाकला असता, महिला वेश्यादलाल 1) नगमा उर्फ जसप्रित उर्फ निलम अजीतकुमार सांशी, 28 वर्षे हिने 01 अल्पवयीन मुलगी व 02 प्रौढ मुलींना पुरुष गिऱ्हाईकास वेश्यादलाल पुरविण्यासाठी प्रवृत्त केल्याने सापळ्यातील रोख रक्कम व इतर मुद्देमालसह ताब्यात घेवुन 01 अल्पवयीन व 02 प्रौढ पिडित असे एकुण 03 मुलींची सुटका केली आहे. सदर बाबत सहाय्यक फौजदार उमेश हरी पाटील यांनी ताब्यातील महिला आरोपी वेश्यादलाल नगमा उर्फ जसप्रित उर्फ निलम अजीतकुमार सांशी, (26 वर्षे) हिचेविरुध्द सरकार तर्फे फिर्याद दिल्याने नवघर पोलीस ठाणे गुन्हा भा.द.वि.सं. कलम 366(अ), 370(3), 372 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 17,18 सह अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 चे कलम 81,87 प्रमाणे 29 मार्च 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मिरा रोड भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील,राजु भोईर, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, चेतनसिंग राजपूत, सम्राट गावडे, महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे, सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर महिला पोलीस शिपाई आफरिन जुन्नेदी नेमणुक भरोसा सेल भाईंदर यांनी केली आहे.