मुंबईक्राईम न्यूज

Virar Crime News : विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ; मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

•पोलिसांनी आरोपीला केले अटक, सराई आरोपीच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विरार :- विरार पोलीस ठाणे हद्दीत (09 मार्च) रोजी 07 ते 11.30 वा. चे दरम्यान अश्लेषा अपार्टमेंट समोर, विवा तारांगण, विरार (पु.), ता. वसई, येथे फिर्यादी यांची मालकी असलेली सिल्वर रंगाची इलेक्ट्रीक मोटर सायकल ही राहते बिल्डींगचे समोर पाकींगमध्ये उभी करून ठेवलेली असतांना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन चोरुन नेले बाबत फिर्यादी महर्षित तेजम, (20 वर्षे) (रा. अश्लेषा अपार्टमेंट समोर, विवा तारांगण, विरार),यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतावर विरार पो.स्टे. गु. भा.दं.वि.सं. कलम-379 प्रमाणे 12 मार्च 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. Virar Crime News

गुन्हयाचे अनुषंगाने विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून, गुप्त बातमीदार यांचेमार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी नावे महेश कांगम्पली,(22 वर्षे) रा.नगिनदासपाडा, नालासोपारा (पु.), ता. वसई, यांस 13 मार्च रोजी अटक केली आहे. आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्याचेकडून गुन्हयातील वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण- 04 मोटर सायकल असा एकुण-1 लाख 70 रुपये किंमतीचा 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Virar Crime News

पोलीस पथक
सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ-3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त ,विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, पोलीस अंमलदार संदिप शेळके, मोहसिन दियाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Virar Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0