Virar Crime News : आचोळे पोलिसांची कामगिरी ; बँकेची बनावट एन.ओ.सी तयार करुन लोन देणाऱ्यांचा केला पर्दाफाश
महागड्या कार परराज्यात विक्री करणाऱ्या अंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यास आचोळे पोलीसांना आले यश विविध राज्यातून 2 कोटी 34 लाख 53 हजार किंमतीच्या 12 कार जप्त
विरार :- 28 सप्टेंबर 2023 रोजी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, त्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये आरोपी याने तो बँकेचा सी.ए आहे.अशी ओळख करून देवुन तो बँकांचे ऑडीट करीत असल्याचे सांगून फिर्यादी यांचे किराणा दुकानाच्या व्यवसायासाठी 2 कोटी लोन मंजुर करुन देतो असे सांगुन त्यांचे व्यवसायाचाबत माहीती व दुकानाची कागदपत्र, घेवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडुन विविध बँकेमध्ये कर्ज मंजुर करण्यासाठी त्यांचे बैंक ॲप्लीकेशन फॉर्म भरून घेवून ती कागदपत्र महागड्या कार खरेदी करण्यासाठी बँकेमध्ये जमा करुन फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावे महागड्या कंपनीच्या कार खरेदी करुन त्यावर बनावट कागदपत्र व बनावट मेल द्वारे वेग वेगळ्या बँकेचे कर्ज मंजूर करून सदरच्या फिर्यादी यांचे ताब्यात न देता त्यांची एकूण 2 कोटी 84 लाख 49 हजार रुपये इतक्या रक्कमेची फसवणूक केल्या बाबत आचोळे पोलीस ठाणे, भादवि कलम 406,420,465,467,471,120 (ब) प्रमाणे 28 सप्टेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Virar Crime News
बँकेचे कागदपत्र देऊन फसवणूक
महागड्या कार खरेदी करुन 2 कोटी 84 लाख 49 हजार रक्कमेची फसवणुक झाल्याबाबत गुन्हा नोंद झाल्यानंतर तसेच फसवणुक करणारी अंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली नमुद आरोपी यांचा शोध घेणेबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार हे गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पाहिजे आरोपी यांचा शोध घेत होते. Virar Crime News
पोलीस कारवाई
गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे राहुल गिरीश शहा हा त्याचे स्वतःचे अस्तित्व लपवुन पुरावे नष्ठ करून बनावट आधार कार्ड व त्यावर स्वतःचे नाव बदलुन कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली व नेपाळ अश्या वेग वेगळ्या राज्यातील आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य करीत होता. त्यामुळे नमुद आरोपी मिळून येत नव्हता. करीता आरोपी याचे विरुध्द पुरावे प्राप्त करुन तांत्रीक विश्लेशनाद्वारे शोध घेत असताना नमुद आरोपी हा हॅॉटेल मेलुहा “द” फर्न, पवई मुंबई या हॉटेलमध्ये वास्तव्य करीत असल्याबाबत खात्रीशिर माहिती प्राप्त झाली. करीता नमुद आरोपी याचा सदर हॉटेलमध्ये जावून शोध घेतला असता तो सुरेश गोपाळ भगत या नावाचे बनावट आधारकार्ड देवुन वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी यास सदर हॉटेलमधून ताब्यात घेवुन त्यांना गुन्ह्यात (03 मार्च 2024) रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी याचे ताब्यात वेगवेगळ्या व्यक्तींची नावे असलेली 08 सिमकार्ड, 1 नेपाळ देशाचे सिम कार्ड, 02 लॅपटॉप, 01 आय पॅड, 09 मोबाईल व 03 बनावट नावाची आधार कार्ड असा एकूण तीन लाख 34 हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याचबरोबर नमुद अटक आरोपी यांचेकडे फेडरल बैंक व टि.एन.बी या बँकेच्या बनावट एन.ओ.सी मिळून आल्या आहेत. Virar Crime News
तपासादरम्यान यातील आरोपी हे फिर्यादी यांना माझी बँकेमध्ये चांगली ओळख आहे असे भासवुन मी तुमचे लोन करुन देतो असे सांगुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडुन लोन संदर्भात लागणारी कागदपत्र प्राप्त करुन सदरची कागदपत्र सुमारे 10 ते 15 बँकेमध्ये जमा करुन फिर्यादी यांचे बनावट ईमेल आय.डी तयार करुन त्या आधारे फिर्यादी यांच्या नावे परस्पर महागड्या कंपनीच्या कार खरेदी करुन सदरच्या कार खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांचा बनावट पत्ता नमुद करुन त्यावर कारचे आर.सी बुक प्राप्त करुन तसेच नमुद कारवर असलेले लोन कमी झाले असल्याचे संबधीत बँकेची बनावट एन.ओ.सी तवार करुन ती आर.टी.ओ यांना सादर करुन त्या कार परराज्यात विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. Virar Crime News
गुन्ह्यात आरोपी नावे
1) राहुल ऊर्फ सचिन ऊर्फ सौरभ गिरीष शहा (41 वर्षे) ओशिवरा, अंधेरी यास अटक करुन त्याचे अटकेदरम्यान आरोपी नामे 2) विजय सुरजमनी सिंग (49 वर्षे), व्यवसाय- रियल ईस्टेट एजन्ट, ,ठाणे 3) भिकाजी ऊर्फ उमेश बबन गोपाळे,पुणे ,4) मोहम्मद नजर मो. जाफर खान (40 वर्षे) व्यवसाय-झोमॅटो डिलीव्हरी भोपाल राज्य- मध्यप्रदेश 5) प्रविण ऊर्फ राणु हुकूमचंद जैन (34 वर्षे) राज्य-मध्यप्रदेश 6) आकाश धोंडीभाऊ मुसळे (25 वर्षे) अंधेरी ,7) विवेक रामदास करंडे (25 वर्षे), व्यवसाय-नोकरी रा. जोसेफ पटील वाडी, सात बंगला, आराम नगर-१, अंधेरी पश्चिम, मुंबई असे एकुण 07 आरोपींना अटक करुन त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास करुन त्यांचे ताब्यातुन 2 कोटी 34 लाख 53 हजार 305 रुपये किंमतीच्या एकुण 12 महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. Virar Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त साो, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 उमेश माने- पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे, (गुन्हे), पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास म्हात्रे, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईगडे, शंकर शिंदे, पोलीस अंमलदार निखील चव्हाण, विनायक कचरे, अमोल सांगळे, मोहनदास बंडगर, मनोज पाईकराव, अमोल बरडे, पोलीस उपनिरीक्षक. आयु कार्यालयात. परि 2 वसई यांनी यशस्वी रित्या केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी हे करीत आहेत. Virar Crime News