क्राईम न्यूजमुंबई

Virar Crime News : नायगाव गुन्हेप्रकटिकरण शाखेकडुन कारवाई ; मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या

Virar Crime News Virar Police Arrested Drug Peddler : अंमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी केली अटक, आरोपीकडून 50 हजाराची मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त.

विरार :- अंमली पदार्थांची विक्री (Drug Seller) करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.नायगाव पोलीस ठाणे (Naygaon Police News) हद्दीत दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी नायगाव पोलीस ताण्याचे हजर असतांना सपोनि गणेश केकान यांना नायगाव पूर्व टिवरी गाच नवकार बिल्डींग नं 03 समोरील चाळीजवळ एक इसम मेफेड्रॉन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत आत्रीशीर बातमी मिळाल्याने सदर कारवाई करणेबाबत वरिष्ठांच्या कारवाई करण्याकरिता दिलेल्या आदेशाने पोलीस निरीक्षक मंगेश अधारे व गुन्हे प्रकटिकरण अधिकारी व अंमलदार यांचेसह कारवाई करण्याकरीता टिम तयार करुन नवकार बिल्डींग नं 03 येथील चाळीसमोरील रोडलगत टिपरी नायगाव पूर्व ता. वसई जि. पालघर या परीसरात कोणाला ओळखू येणार नाही अशा पध्दतीने सापळा रचून थांबून राहीलो. त्यानंतर 7.50 वा.च्या सुमारास एक एक्सेस स्कुटर वरुन एक इसम सदर ठिकाणी आला असता त्यावेळी आमच्या गुप्तबातमीदार याने सदरचा इसम हा तोच असल्याचे सांगून तो निघुन गेला. वरीष्ठांचे इशा-यावरुन सापळा लावलेल्या पोलीसांनी एक्सेस स्कुटरसह ताच्यात घेतले, सदर इसमास त्यांचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता शानु वसीम कुरेशी, (28 वर्षे), मरीमनगर, नायगाव‌ असे सांगीतले. Virar Crime News

व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या एक्सेस स्कुटरची सीट चेक केली असता सदर सीटच्या खाली एक प्लास्टीक पिशवीत पांढ-या रंगाचा 50 हजार रु रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगत असतांना मिळून आला, तसेच सदर गुन्हयात करीत असताना वापरण्यात आलेला सुझकी एक्सेस व आरोपीत यांचा मोबाईल असा एकुण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर बाबत नायगाव पोलीस ठाणे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (एनडीपीएस ॲक्ट) कलम 8(क), 21 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास हा पोउपनिरी/अशोक गुजाल हे करीत आहेत. तसेच त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये सदर आरोपीत हा खालील गुन्हयात पाहिजे आरोपीत असल्याबाबत निष्पन्न झाले आहे. Virar Crime News

पोलीस पथक
पोर्णिमा चौगुले, पोलीस उप आयुक्त परीमंडळ 2 वसई, पदमजा बडे, सहाग्यक पोलीस आयुक्त सो, वसई विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मंगेश अंधारे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडची, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0