मुंबई

PM Narendra Modi 75th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त फोनवरून संवाद; युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी मोदींकडून अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा

ANI :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, 17 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना देशासह जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधान मोदींना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्रम्प यांच्या फोन कॉलचे मोदींकडून स्वागत

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ट्रम्प यांनी फोन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या पोस्टमध्ये मोदींनी म्हटले आहे की, “माझ्या मित्रा, राष्ट्रपती ट्रम्प, तुमच्या फोन कॉल आणि वाढदिवसाच्या मनापासून दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.”

या संभाषणादरम्यान, युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाऱ्याला पंतप्रधान मोदींनी पाठिंबाही दर्शवल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील चर्चा पुन्हा सुरू झाल्या असतानाच ट्रम्प यांनी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आहे.

देशभरातून राजकीय शुभेच्छा

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील राजकीय नेत्यांकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, मोदींच्या नेतृत्वात भारत देश वैश्विक महत्त्वाकांक्षांचे केंद्र झाला आहे. परंपरेला विज्ञानाची जोड देऊन त्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकेपर्यंत भारताचा गौरव केला आहे. अमित शाह यांच्याप्रमाणेच शरद पवार, चंद्राबाबू नायडू आणि इतर अनेक दिग्गजांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0