Vijay Wadettiwar : महायुतीच्या आमदाराला निवडणूक लढवण्यासाठी सरकारी तिजोरीतून दहा कोटीचा खर्च ; राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Vijay Wadettiwar On Mahayuti Sarkar : सरकारी पैशांवर स्वतःला चमकवण्यासाठी दीड हजार कोटीचा डल्ला!
मुंबई :- राज्यात शासनाच्या विविध योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट आले असताना आता सरकारी तिजोरीला आणखी एक थीगळ पडणार असल्याचा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी सांगितले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे सर्वच पक्षांनी तयारी चालू केली असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं सामना यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. परंतु राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महायुतीचा एक एक आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्रत्येकी 10 कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचे टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महायुती सरकारच्या जाहिरातीचे तसेच योजनेचे प्रसार आणि प्रचार करण्याकरिता 90 कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. Maharashtra Latest Political News
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
महायुतीचा एक एक आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्रत्येकी 10 कोटींचा खर्च !
निवडणुकीपूर्वी जनतेच्या पैशातून स्वतःचा प्रचार आणि प्रसार करायला जाहिराती कमी पडल्या की आता सोशल मीडिया मार्केटिंग करीता महायुतीने 90 कोटींचे टेंडर काढले आहे.
एकीकडे आचारसंहिता लागणार म्हणून विविध विभागात स्पर्धा लागली आहे, खर्च करायला निधी मिळावा, आणि दुसरीकडे सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी पैसे वाया घालवले जात आहेत.
राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाले नाही, कंत्राटदार बिलासाठी आंदोलन करत आहे, शिष्यवृत्तीचे पैसे अडकले आहेत पण सरकारी पैश्यावर स्वतःला चमकवण्यासाठी मात्र 1500 कोटींचा डल्ला आता पर्यंत मारला गेला आहे.