Vijay Wadettiwar : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तत्काळ शेतीची पंचनामेची मागणी


•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले आश्वासन
मुंबई :- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन मुंबई चालू आहे. अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या फळबागाच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदील झाला आहे गारांचा पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत मिळावी याकरिता विधानसभेत विरोधी पक्षनेते यांनी पंचनामाची आणि तात्काळ मदतीची मागणी केली असून या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
अकोला, बुलढाणा, नाशिक, जालना जिल्ह्यात रात्री मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे बळीराजावर पुन्हा अवकाळी संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळाबागांचे मोठं नुकसान झाले आहे. Vijay Wadettiwar
एकामागून एक नैसर्गिक संकट, महागाई आणि सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आधीच शेतकरी खचून गेला आहे त्यात पुन्हा नव्याने हे संकट. अशा स्थितीत सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही सरकारकडे मागणी आहे. Vijay Wadettiwar
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामाचे दिल्या निर्देश
मराठवाडा, विदर्भासह नाशिक व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात काल रात्री गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने संत्रा, कांदा बीजोत्पादन, गहू, हरभरा, मोहरातून फळात रूपांतरित होत असलेला आंबा आदी पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक चौकशीत समजले आहे. Vijay Wadettiwar
याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Vijay Wadettiwar