Vidhan Parishad Election Result : विधान परिषद निवडणुकीत मुंबईतील दोन्ही जागांचे निकाल जाहीर, उद्धव ठाकरे यांनी मारली बाजी
Vidhan Parishad Election Result : मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (ठाकरे) Thackeray Group वर्चस्व आहे.
मुंबई :- लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या Vidhan Parishad Election Result चार जागांसाठी सोमवारी (1 जून) निकाल जाहीर झाला. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी (Mumbai Graduate Constituency Election) झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. मुंबईतील दोन्ही जागा शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांनी जिंकल्या.मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब Anil Parab यांचा 26 हजार 26 मतांनी विजय मिळवला. तर शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारली आहे. अभ्यंकर यांनी 4 हजार 83 मतांनी विजयश्री खेचून आणली आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून (Mumbai Graduate Constituency Election) शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब Anil Parab यांनी सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) किरण शेलार यांचा पराभव करून विजय मिळवला. परब यांना 44,784, तर शेलार यांना 18,772 मते मिळाली. 26 जून रोजी झालेल्या मतदानात एकूण 67,644 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
एकूण पडलेल्या मतांपैकी 64,222 मते वैध ठरली आणि विजयी कोटा 32,112 मतांचा होता. अनिल परब यांना पहिल्या पसंतीच्या मतदानात 44,784 मते मिळाली आणि ते निवडून आले. विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान झाले होते. यामध्ये मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या जागांसाठी मतदान घेण्यात आले आणि निकाल 1 जून रोजी जाहीर झाला.
मुंबईत फक्त उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल – अनिल परब
अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. हा विजय मी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण माझ्या विजयासाठी लढणाऱ्या शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे आभार. मुंबईत फक्त उद्धव ठाकरेंची शिवसेनाच असणार हे सिद्ध झालं आहे.असे ते म्हणाले. बाळासाहेबांचे आशीर्वाद असेच राहोत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मतं मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.