Vasant More : मनसेतून फारकत घेतलेले वसंत मोरे यांचा वंचित मध्ये प्रवेश…!!
Vasant More Joined Vanchit Bahujan Aaghadi : वसंत मोरे यांना पुणे लोकसभा क्षेत्रातून वंचित कडून उमेदवारी जाहीर, दोन दिवसानंतर वंचित मध्ये प्रवेश
पुणे :- मनसेला राम राम करणाऱ्या वसंत मोरे Vasant More यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. अकोल्यातील कृषीनगर भागाततील प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांच्या यशवंत भवन निवासस्थानी वसंत मोरेंनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शुक्रवारी अखेर वंचितचा झेंडा हाती घेतला. Vasant More Joined Vanchit Bahujan Aaghadi
आधी मविआ नेत्यांच्या घेतल्या भेटी दरम्यान, वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मोरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. मनसेतून राजीनामा देऊन वसंत मोरे Vasant More यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र मविआकडून उमेदवारीबाबत नकारघंटा मिळाल्याने वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली. Vasant More Joined Vanchit Bahujan Aaghadi
वंचितच्या जोरावर यंदा विजयी निश्चित यावेळी ते म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपूर्वी माझी उमेदवारी झाली आणि आता मी वंचितमध्ये प्रवेश केला. मी प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांचा आभारी आहे कारण त्यांच्यामुळे मला पुण्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मी प्रथमच मनसे सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. मी जिंकण्यासाठीच लढत आहे. पुण्यात वंचितच्या जोरावर मी यंदा नक्की विजयी होणार”, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला. Vasant More Joined Vanchit Bahujan Aaghadi