Vasai Scam News : वालीव गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; व्यापारांचा विश्वास संपादन करुन व्यापारांकडून स्टेशनरीचा मालाची ऑर्डर देऊन खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता आर्थिक फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक
Valiav Police Arrested Scamster From Vasai : 6 लाख 28 हजार 770 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
वसई :- स्टेशनरी व्यापाराची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना वालीव पोलिसांनी अटक केली आहे.फिर्यादी नाव अब्दुल्ला मोहम्मद यूसुफ शेख यांची ब्राईट फायलिंग सोलुशन मॅन्युफॉक्चरींग नामक कार्यालयीन स्टेशनरी उत्पादन करण्यारी कंपनी आहे. फिर्यादीचे नमुद कंपनीस आरोपींनी बॉक्स फाईलची ऑर्डर देऊन फिर्यादीकडुन 22 फेब्रुवारी रोजी व 24 फेब्रुवारी रोजी असे दोन टप्प्यात एकुण 1868 बॉक्स फाईल व 300 स्प्रीग फाईल असा एकुण 1 लाख 48 हजार 770 रुपये किंमतीचा स्टेशनरी माल खरेदी केला. परंतु फिर्यादीस आरोपींनी पुढील तारखेच्या धनादेशाद्वारे मालाची रक्कम देण्याचे आश्वासीत करुन फिर्यादीस न वटणारे परंतु पुढील तारखेचे धनादेश दिले. त्यापोटी फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवून आरोपींना एकूण 1868 बॉक्स फाईल व 300 स्प्रीग फाईल असा एकुण 1 लाख 48 हजार 770 रुपये किंमतीचा स्टेशनरी मालाचा पुरवठा केला. तथापि, आरोपींनी खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता माल स्विकारुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. त्याअनुषंगाने फिर्यादी अब्दुल्ला मोहम्मद युसुफ शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वालीव पोलीस ठाणे कलम 420 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. Vasai Scam News
पोलिसांकडून आरोपीचा शोध
गुन्हयाचे तपासादरम्यान तांत्रीक विश्लेपणाचे आधारे आरोपीताची माहीती काढुन भाईंदर व मिरारोड परीसरातुन शोध घेतला. प्रस्तुत अपराध प्रकरणाच्या अनुषंगाने प्राप्त माहिती व निष्कर्षाच्या आधारे आरोपी नामे 1) राजन ऊर्फ मनोज रामलाल सोनार (43 वर्ष), व्यवसाय स्टेशनरी व्यवसाय सप्लाय, 2) तेजस सतीश पाटील (31 वर्ष), व्यवसाय स्टेशनरी सप्लाय व्यवसाय, यांना ताब्यात घेण्यात आले. उभय आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपींनी फसवणुक केलेल्या मालापैकी अंशतः माल हा जि. अहमदाबाद राज्य गुजरात येथील इसम नावे शांतीलाल जैन यास विक्री केल्याची बाब उघड झाली. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे पोलीस पथक पाठवुन गुन्हयातील आरोपीत शांतीलाल जैन यांचेकडून गुन्हातील स्टेशनरी साहीत्यामध्ये लागणारे सेलो टेप, बॉक्स फाईल व स्प्रींग फाईल असा एकुण 6 लाख 28 हजार 770 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींकडून दोन गुन्हाची यशस्वी उकल करण्यात वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण शाखेस यश आले आहे. Vasai Scam News
पोलीस पथक
पौर्णीमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, उमेश माने- पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, पोलीस अंमलदार विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे. Vasai Scam News