Vasai Crime News : दोन सुटकेसमध्ये तब्बल 24 किलो गांजा, रिक्षासह दोन आरोपींना केले अटक
Vasai Crime News : पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कामगिरी ; 24 किलो गांजा जप्त.
वसई :- पेल्हार पोलिसांच्या Pelhar Police गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 22 मे च्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तुंगार फाटा वसई येथे दोन व्यक्ती रिक्षा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या व्यक्तींकडे गांजा हा अमली पदार्थ Ganja Smuggling असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी Vasai police एक पथक तयार करून पोलीस निरीक्षक शकील शेख गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तोफा तुकाराम भोपळे व अंमलदार यांना मिळालेल्या मागणीच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलिसांचा एक पथक तुंगार फाटा येथे सापळा अजून बसला होता. Vasai Crime News
पोलिसांनी या सापळ्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे एक रिक्षा येताच तिची झडती घेतली असता त्या रिक्षामध्ये दोन व्यक्ती होते आणि त्यांच्याकडे दोन सुटकेस बॅग होत्या आणि त्या बँगेत जवळपास 24 किलो गांजा पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी लगेच संबंधित दोन आरोपींना अटक केली आहे यामधील एका आरोपीचे नाव मनोज कुमार रामेश्वर यादव (30 वर्ष) तर दुसरा मनोज शामदेव साव (30 वर्ष) हे अटक करून त्यांच्या जवळील पाच लाख 28 हजार किमतीचा गांजा थांबली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 23 मे रोजी पेल्हार पोलीस ठाणे येथे आरोपींच्या विरोधात अंमली पदार्थ आणि अधिनियमन 1985 चे कलम 8 (क) 20 (य) ii(क) 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा पुढील तपास चालू आहे. Vasai Crime News
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3. विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे,कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पो.अं. रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, निखील मंडलिक, सुजय पाटील, सर्च नेम. पेल्हार पोलीस ठाणे Pelhar Police Station यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Vasai Crime News
Web Title : Vasai Crime News: Two accused arrested with 24 kg ganja, rickshaw in two suitcases