मुंबईक्राईम न्यूज

Mumbai Crime News : 1930 सायबर क्रमांक ठरला देवदूत, पोलिसांना तब्बल 39 लाख रुपये तक्रारदाराचे परत करण्यास आले यश

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाची मोठी कामगिरी ; पोलीस अधिकारी आणि आयकर अधिकारी असल्याचे सांगून फसवणूकीची रक्कम तक्रारदाराला परत देण्यास मुंबई पोलिसांना यश

मुंबई :- आयकर अधिकारी आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तक्रारदार याचे Fedex Courier आल्याचे सांगून अनाधिकृत पणे बँक खात्यामार्फत ट्रांजेक्शन झाल्याचं सांगुन तक्रारदाऱ्याला अटक करण्याचे फायदे दाखवून दोन ट्रांजेक्शन मार्फत 39 लाख 88 हजार 526 रुपये ट्रान्सफर करण्यात भाग पाडले. या घटनेनंतर साकीनाका परिसरात राहणारे जे मुंबईत खाजगी कंपनीत काम करणारे यांनी सायबर पोलिसांच्या 1930 हेल्पलाइन नंबर ला कॉल करून घडलेल्या घटना सांगितले.

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने त्वरित घटनेबाबत पत्रव्यवहार करून संबंधित रक्कम बँक खात्यामध्ये गोठवण्याकरिता मुंबई पोलीस गुन्हे शाखेंतर्गत 1930 या हेल्पलाइनवर कार्यरत असलेले सायबर गुन्हे आर्थिक फसवणूक झालेले तक्रारदार यांनी त्यांची फसवणूक झाल्यानंतर सायबर विभागाने तत्काळ संबंधित बँक वॉलेट मर्चंट इत्यादी इत्यादी मॉडेल अधिकाऱ्यांची समन्वय साधून फसवणुकीचे रक्कम संबंध खात्यात गोठवण्यात यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे तक्रारदार यांचे 39 लाख 88 हजार 526 पोलिसांना यश आले त्यामुळे पोलिसांचा हेल्पलाइन नंबर असलेला 1930 तक्रारदार याच्यासाठी देवदूत ठरला आहे.

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त, गुन्हे,शशीकुमार मिना, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, आबुराव सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर गुन्हे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दत्ताराम चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. पश्चिम सायबर पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस हवलदार महेश मोहीते पोलीस शिपाई किरण पाटील यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0