Hit And Run Case : ट्रकने ठोकर मारुन अंधाराचा फायदा घेऊन ट्रकसह फरार झालेल्या आरोपीस अटक करण्यास पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.
Vasai Crime News Hit And Run Case : ट्रक चालकाने अपघात करून फरार ,पोलिसांनी केले अटक
वसई :- पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दि. (16 एप्रिल ) रोजी पहाटे 04.00 वा.सुमारास संस्कृती हॉस्टीटलचे जवळ, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 08 वर वसई येथे एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे 35 ते 40 वर्षे यास कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालवुन ठोकर मारल्याने सदर इसमाच्या डोक्याचा, उजव्या हाताचा पूर्ण चेंदा मेंदा होवुन, डाव्या हातावर गंभीर जखमा होवुन, पोटावर, छातीवर किरकोळ जखमा होऊन त्याच्या मरणास कारणीभुत झाला असुन सदर वाहनचालक याने मयत यास दवाउपचाराकरीता न नेता तसेच अपघाताची खबर न देता फरार झाला होता. सदरबाबत पेल्हार पोलीस ठाणे येथे अज्ञात वाहन चालकाविरोधात भा.दं.वि.सं 204 (अ), 279,337,338 मोटार वाहन अधिनियम कलम 184,187 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. Vasai Hit And Run Case
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्हयातील अज्ञात वाहनाचा व त्यावरील चालकाचा शोध घेणेबाबत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना सुचना देऊन आदेशित केले होते.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळाचे परिसरातील सुमारे 50 ते 60 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासुन तांत्रिक माहिती बारकाईने अभ्यास करुन सदर गुन्हयातील मयत इसमास ठोकर मारुन फरार झालेल्या वाहनाचा शोध घेतला असता मयत यास ट्रक या वाहनाने ठोकर मारली असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रक वरील चालक सुरजित स्वरण सिंग, (59 वर्षे) (रा. जि. गुरदासपुर राज्य पंजाब).यास सदर गुन्हा केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. Vasai Hit And Run Case
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखील मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Vasai Hit And Run Case