मुंबईक्राईम न्यूज

Vasai Crime News : सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले अटक, घरफोडी मध्ये लाखोंची मलाई

माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; सराईत भामट्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटार सायकल असा जवळपास 12 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

वसई :- सराईत गुन्हेगारी करणाऱ्या चोराला माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून अटक करण्यात आले आहे. या भामट्यावर वसई विरार मीरा-भाईंदर आणि मुंबई इतर आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 57 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या चोरट्याचे पितळ उघडे होण्यासाठी वसईच्या शास्त्रीनगर परिसरातील सिल्वर सॅन्ड सोसायटीमधील माधवराव भीमराव वाडीकर (50 वर्ष) यांच्या घरातील चोरी याचा शोध घेताना उघड झाले आहे.घराला कुलूप असताना किचन मधील लोखंडी खिडकीचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश सोन्याचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला, या घटनेनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून 454,457,380 कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

माणिकपूर पुणे प्रकटीकरण विभागाने विषयाची गांभीर्याने लक्षात घेऊन पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचे मागवा घेतला. पोलिसांच्या वर्णनावरून आरोपी आशिष दत्ताराम साखरकर (36 वर्ष) वसई विरार परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक आरोपीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीने यापूर्वी बोरवली आणि विलेपार्ले या परिसरात अशाच प्रकारे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जवळपास 12 लाख 22 हजार 650 किमतीचे असे सोन्या चांदीचे वस्तू, रोख रक्कम, मोटर सायकल दस्तऐवज पोलिसांनी जमा केला आहे. आरोपी याच्याकडून 06 गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर मुंबई आयुक्तालयाच्या आणि इतरत्र हद्दीत जवळपास 56 गुन्हे असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी म्हणजेच पौर्णिमा चौगुले/श्रिगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02, पद्मजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई, राजू माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कांदे, पूजा कांबळे व पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ 02 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागूल, पोलीस अंमलदार अमोल बर्डे, यांनी यशस्विरीत्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0