Vasai Crime News : वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ; वाहन चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक
आरोपींकडून 6 मोटार वाहन जप्त करुन 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
वसई :- वालीव गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे हे आरोपी सराईत वाहन चोर होते. पोलिसांना आरोपींकडून तीन मोटर वाहन जप्त करण्यास यश आले आहे. फिर्यादी अन्बर खुज्जादीन कुरुश यांचे नाईकपाडा, वसई पूर्व परीसरात “सलामत चिकन सेंटर” नावाचे दुकान आहे. दुकानाच्या बाहेर पार्क करुन ठेवलेली फिर्यादीची होंडा कंपनीची डिओ मोटार सायकल ही 9 मार्च ला अज्ञात चोरटयाने चोरी केली. सदरबाबत वालीव पोलीस ठाण्यात कलम 379 भा.दं.वि. या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेली कारवाई
वसई-विरार परीसरात मोटार वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले. उमेश माने पाटील, सहाय्यक उप आयुक्त, तुळींज विभाग व जयराज रणवरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार वालीव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सि.सि.टी.व्ही. फुटेजच्या आधारे शोध मोहिम राबवून वसई पुर्वस्थित सातिवली वसई पुर्व परीसरातुन आरोपी नामे 1) रोहीत राजेश सिंग रा.अंबरनाथ पश्चिम 2) अनिल कपुर सिंग रा. अंबरनाथ 3) मोहन हरजीत सिंग,वसई पूर्व यांना ताब्यात घेण्यात आले. नमुद आरोपीतांकडे केलेल्या सखोल तपासात आरोपींकडून वसई, विरार व नालासोपारा परीसरातुन चोरी केलेल्या 5 मोटार सायकली आणि 1 ऑटो रिक्षा असे एकूण अंदाजे किंमत 3 लाख 60 हजार वाहने जप्त करुन एकुण 6 वाहन चोरीच्या गुन्हांची यशस्वी उकल करण्यात वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणशाखेस यश आले.
पोलीस पथक
पौर्णीमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, पोलीस अंमलदार विनायक राऊत, अभिजीत गहरी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.