Vasai Crime News : नायजेरियन नागरिकाकडून तब्बल 11.58 काेटींचे मेफेड्रॉन (एम डी) आणि काेकेन जप्त!

•वसई पूर्व, एव्हरसाईनसिटी परीसरातील फरशी कारखान्याचे जवळ असलेल्या महेश अपार्टमेंट मधील तिस-या व चौथ्या मजल्यावर अंमली पदार्थ विक्री नायजेरियन नागरिक करत असल्याची बातमी गुन्हे शाखा कक्ष-2 वसई शाखेला मिळाली होती.
वसई :- भारतात वास्तव्यास असणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला कोकेन आणि एमडी (मेफेड्रॉन)या अंमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-2 वसई पोलिसांनी अटक केली आहे.या नायजेरियन व्यक्तीकडून 11 कोटी 58 लाख 856 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पाेलिसांच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाने तसेच गुन्हे शाखा कक्ष-2 वसई यांनी एव्हरशाईनसिटी, वसई पूर्व भागातून अटक केली आहे. व्हिक्टर ओडीचीन्मा ओनुवाला उर्फ डाईक रेमंड आणि इंग्वेनुबा चुक्चेबुका चिमाओबी असे अटक केलेल्या आराेपीचे नावे आहे. वालीव पाेलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,व्हिक्टर ओडीचीन्मा ओनुवाला उर्फ डाईक रेमंड रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थ विक्री करत असल्याची महेश अपार्टमेंट, तिसरा मजला, अवध अपार्टमेंटच्या मागे, एव्हरशाईनसिटी, वसई पूर्व तस्करी करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विराेधी पथकाला मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.48 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ तर व्हिक्टर ओडीचीन्मा ओनुवाला उर्फ डाईक रेमंड याच्याकडून 22 किलो 865 ग्रॅम वजनाचा एम डी (M.D.) मेफेड्रॉन असा एकूण 11 काेटी 58 लाख 865 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-2 वसई युनीटचे पोलीस निरीक्षक समीर आहीरराव पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजीत गिते, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, मुकेश पवार,रविंद्र पवार,चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, राजाराम काळे, जगदीश गोयारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहूल कर्पे, पोलीस नाईक प्रशांतकुमार ठाकुर, पोलीस अंमलदार अनिल साबळे, अजित मैड, प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड,अविनाश चौधरी गुन्हे शाखा कक्ष 2 वसई, महीला पोलीस अंमलदार साक्षी डोईफोडे,शाखा, नालासोपारा यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.



