Sangali Bribe News : सांगली महापालिकेचा भ्रष्ट ‘बॉस’ जाळ्यात! 7 लाखांची लाच मागणाऱ्या उपायुक्तावर ACBचा घाव”

Sangali Latest Bribe News : 24 मजली टॉवरच्या परवान्यासाठी 10 लाखांची डिमांड, 7 लाखांवर तडजोड
सांगली | राज्यभर लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात ACBने छेडलेल्या मोहिमेने आता सांगलीत मोठा ‘हिट’ केला आहे. महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप उघड झाला असून, सापळ्यात त्यांची 7 लाखांवर तडजोड झाल्याची माहिती समोर आली आहे. Sangli bribe arrest by ACB
तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार ACBपर्यंत पोहोचला आणि मग काय, सापळा रचण्यात आला. प्राथमिक चौकशीत साबळे यांची लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर, त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बातमी उघड होताच महापालिका प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
हे प्रकरण अजून थंडसुद्धा झालं नव्हतं, तोच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उपजिल्हाधिकाऱ्याने 41 लाखांच्या लाचेची मागणी करत ACBला हादरवून टाकलं होतं. त्यांच्याकडून अर्धी रक्कम आधीच घेतली गेली होती आणि उर्वरित रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरी 50 लाखांचं सोनंही सापडलं.
या घडामोडी स्पष्ट सांगतात – लाचखोरीचा सडा राज्यभर पसरलेला आहे. पण ACBचा चापट देणारा हात आता अधिकाऱ्यांच्या गळ्याशी येऊन थांबतोय!



