Pune Police News : गुंड गजा मारणेबरोबर ‘मटणपार्टी’ करणाऱ्या पोलिसांचे निलंबन

Pune Police With Gaja Marne ; पुण्यातील प्रसिद्ध गुंडा गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना मटण पार्टी करणाऱ्या पोलिसांना चांगलेच भोवलं
पुणे :- येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याची माहिती समोर आली आहे.मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या सहायक निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश त्यांनी दिला. तसेच मारणेला ढाब्यावर भेटणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. Pune Police Suspended 5 In Gajanan Marne Connection
कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे आणि साथीदार येरवडा कारागृहात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत होते. त्या वेळी पोलीस बंदोबस्तावर सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी होते. वाटेत एका ढाब्यावर मारणेची व्हॅन थांबविण्यात आली.मारणेला तेथे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते हे भेटले. विशाल धुमाळ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्यासह त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराईतवर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



