मुंबई

Vasai Crime News : “जहाजात लपूनही कायदा चुकला नाही! सुनिल प्रजापतीला नायगाव पोलिसांचा विळखा”

“खुनाचा आरोपी जहाजात लपला… पण नायगाव पोलिसांच्या सापळ्यातून सुटू शकला नाही!

वसई/नायगाव : सेनरजी हायजील कंपनीत झालेल्या किरकोळ वादातून एका कामगाराचा जीव घेणारा आरोपी सुनिल प्रजापती तब्बल गुजरातच्या ओका-द्वारका बंदरावरील जहाजात आश्रय घेत लपून बसला होता. मात्र, नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कौशल्यपूर्ण तपासणीने आरोपीस जहाजातून बाहेर ओढून काढत रंगेहात अटक करण्यात यश आले. या थरारक कारवाईमुळे वसई-पालघर परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वादातून पेटला खून!
कामगार दिलीप सरोज व आरोपी सुनिल प्रजापती यांच्यात जेवणाच्या खर्चाच्या पैशावरून चिघळलेला वाद रक्तरंजित वळणावर गेला. संतापलेल्या सुनिलने दिलीपच्या डोक्यावर, डोळ्यांवर आणि हातावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान दिलीपचा मृत्यू झाला आणि खुनाचा गुन्हा नोंदवला गेला.

गुन्ह्यानंतर आरोपी फरार… जहाजात लपला!
खुनानंतर सुनिल प्रजापती फरार झाला. पोलिसांनी दोन विशेष पथके तयार करून त्याच्या शोधाला सुरुवात केली. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांना समजले की आरोपी गुजरातच्या ओका-द्वारका बंदरावर जहाजात लपून बसला आहे. तेथे तब्बल २०० हून अधिक जहाजांची तपासणी करून शेवटी पोलिसांनी सुनिलला गाठले आणि बेड्या ठोकल्या.

अतुलनीय पोलिस कामगिरी!

या धडाकेबाज कारवाईत पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चीगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ पोगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम आणि तपास अधिकारी पोनि अभिजीत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश केकान, पोउपनिरी ज्ञानेश्वर आसवे, तसेच गुन्हे शाखेच्या जवानांनी जीव धोक्यात घालून ही कारवाई पूर्ण केली.

वादातून खून – आरोपी जहाजात लपला २०० जहाजांची झडती – पोलिसांचा थरारक शोध नायगाव पोलिसांच्या सापळ्यात आरोपी हेरला संपूर्ण वसई-पालघर पोलिस दलाचे कौतुक

“जहाजात लपूनही कायदा टळत नाही, नायगाव पोलिसांची शिताफी – खुनाच्या आरोपीला बेड्या”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0