Vasai Crime News : घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक; 4 गुन्हयांची उकल

वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण युनिटला यश
वसई :- घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण युनिटच्या Valiav Crime Beanch Unit पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीला विरार येथून ताब्यात घेतले असून 4 गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Vasai Latest Crime News
वालीव गावात राहणाऱ्या नागेश नथुजी शेळके यांच्या घरी 4 मार्च ते 5 मार्चच्या दरम्यान चोरट्यांनी स्लाइडिंगची खिडकी उचकटून आत प्रवेश करत घरातील टीव्ही आणि रोख रक्कम असा 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तसेच, वसई विरार परिसरात घरफोडी आणि मोटार वाहन चोरीचे प्रमाण वाढते लक्षात घेता पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 यांनी घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, वालीव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि अंमलदार सल्लक 10 दिवस गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करून आरोपी करीम इनातुल शेख (33 वय रा. गोकुळ टाऊनशिप विरार पश्चिम) याला ताब्यात घेण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने वसई पूर्व परिसरातून चोरी केलेल्या दोन मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केले आहे. तसेच आरोपीने वाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेले आणि भोईवाडा भिवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या मोटरसायकल आणि महागड्या वस्तू पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन मोटरसायकल, एक टीव्ही, हातगाडी चार मोबाईल फोन आणि वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड आणि रोक रक्कम असा एकूण एक लाख 32 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करून आरोपीला वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई, उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरक्षनाथ जैद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्चे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, विनायक राऊल, पोलीस नाईक बाळू कुटे, पोलीस शिपाई सचिन लांडगे, केतन गोडसे, नारायण केंद्रे यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.



