Varsha Gaikwad Meet Uddhav Thackeray : वर्षा गायकवाड मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
काँग्रेसच्या वतीने वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी,मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई :- महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी एक मताने लढत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या वतीने वर्षा गायकवाड Varsha Gaikwad या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या नंतर त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर आपण पहिल्यांदा पंजा या चिन्हाला मतदान करणार असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्याच हातात मशाल असल्याचे सांगत, त्याच हाताने पुढे तुतारी वाजवणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
वर्षा गायकवाड Varsha Gaikwad या पूर्ण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्या मुंबईतून कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात. मी देखील आता त्यांचा मतदार आहे. त्यामुळे आपण त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवणारच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. यावरही पत्रकारांशी प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुती सोबत आम्ही अद्याप आघाडी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराचे आम्हाला माहिती नाही असे खोचक उत्तर त्यांनी दिले आहे.
सहाही जागा आम्ही जिंकणार – वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. मी गेल्या दहा महिन्यापासून याच मतदारसंघांमध्ये राहत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मला माहिती आहे. मुंबईमधील सर्वच्या सर्व सहा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा दावा देखील वर्षा गायकवाड यांनी केला आहे.