Jitendra Awhad : खळबळ जनक बातमी ; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड ईव्हीएम मशीन आणि वोटिंग कार्ड यांनी याबबातचा व्हिडिओ ट्विट
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून
ठाणे :- ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबबातचा व्हिडिओ ट्विट केलाय. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील रिकाम्या खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या. अचानक आठवण आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला. या बंद खोलीमध्ये बंद लिफाफे ,मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम (EVM) सापडले. त्यानंतर या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश काढण्यात आलेत. Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये जिण्याखालील एक खोलीत ईव्हीएम मशीन सापडल्या. मतदानासाठी जितक्या मशीन वापरल्या जातात, मतदान संपल्यानंतर त्या मशीनची मोजदाद करुन निवडणुक अधिकाऱ्याच्या हातात सोपवाव्या लागतात. मग ठाण्यात सापडलेल्या ईव्हीएम मशीन आल्या कुठून, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएमचा घोटाळा होत, ईव्हीएम बदलले जातात ही मनात साशंकत आहे. मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे. बॅलेट पेपरने मतदान झाल्यास आपल्या देशाची लोकसंख्या पाहात मतमोजणीला चार दिवस लागतील, पण मनात संशय राहाणार नाही असंही आव्हाड यांनी म्हटलंय. Jitendra Awhad