Uran Vidhan Sabha : प्रीतम जे एम म्हात्रे यांचा विजय निश्चित- जेष्ठ कार्यकर्त्यांचा दावा
उरण जितिन शेट्टी : उरण विधानसभा निवडणुकीत Uran Vidhan Sabha Election महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे Pritam Mhatre निवडून येणार असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे. २० नोव्हेंबरला उरण विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शेतकरी कामगार पक्षाने तालुक्यातील गावागावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर उरण मतदार संघातील उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे निवडून येतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. दरम्यान उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारांमध्ये पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, शेकापाचे ज्येष्ठ नेते नरेश घरत, माजी सभापती काशिनाथ पाटील, कामगार संघटना जिल्हाध्यक्ष रवी घरत, उरण तालुका चिटणीस विकास नाईक, उरण तालुका महिला अध्यक्ष सीमा घरत, उरणच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील, उरण तालुका चिटणीस सुरेश पाटील, उरण तालुका लाल ब्रिगेड संघटना अध्यक्ष अविनाश भगत, उरण विधानसभा अध्यक्ष रमाकांत पाटील, सरपंच संतोष घरत, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, खालापूर तालुका चिटणीस संतोष जंगम, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष मयूर सुतार, लाल ब्रिगेडचे नितीन म्हात्रे, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल खारपाटील, अरुण पाटील, जेष्ठ कार्यकर्ते भास्कर ठाकूर, दामोदर मुंबईकर, जगदीश ठाकूर, वसंत म्हात्रे, प्रशांत खारपाटील, अनंत नारंगीकर, प्रदीप ठाकूर, सतीश पाटील, अमित मुंबईकर, दीपक कातकरी, तसेच अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते सक्रियपणे सहभागी झाले होते. या निमित्ताने उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या मतदारसंघातील तरुणांसाठी रोजगाराची निर्मिती तसेच येथे येऊ घातलेल्या विकास प्रकल्पात येथील तरुणांना प्रशिक्षण अभावी नोकऱ्या मिळू शकत नाहीत त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे काम केले जाईल, त्यातून त्यांना नोकरीची संधी मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.