उरण महाराष्ट्र मिरर : उरण येथे शेकाप नेते प्रितम म्हात्रे Pritam Mahtre यांच्या प्रचारार्थ काढलेल्या मोटरसायकल रॅलीला उरण शहर व परीसरातील Uran City गावातून तरूणानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
उरणच्या कोट नाक्यावरून निघालेल्या रॅलीत तरुण युवक शहरातील व्यापारी उद्योजक, कामगार ममोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 15 नोव्हेंबर रोजी महागणपती चिरनेर येथे बाप्पांचे दर्शन घेऊन प्रीतम म्हात्रे यांची मोटरसायकल रॅली पुढे भोम, कळंबूसरे, मोठी जुई, कोप्रोली, पानदिवे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, गोवठणे, आवरे, कोप्रोली, खोपटा, उरण शहर येथे नेण्यात झाली. या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. येऊन येऊन येणार कोण, प्रीतम दादा शिवाय आहेच कोण, उरणचे आमदार प्रीतम दादा होणार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. तरुणाई या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. यावेळी जेएन पी टी कामगार नेते रवि घरत, प्रवक्ते रमाकांत म्हाञे, निधी ठाकूर आदीच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या रॅलीत अनेक जण सहभागी झाले होते.