क्राईम न्यूजमुंबई
Trending

unauthorized construction In Vasai : वसई-विरार महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे यांच्याकडून तक्रार, अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल

unauthorized construction In Vasai : अनधिकृत बांधकाम करून लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तसेच दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विरार :- वसई-विरार महानगरपालिकेच्या Vasai Virar BMC हददीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम विकासक यांनी बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता आरक्षित जागेवर बिल्डींग उभी Illegal Building Construction In Vasai करुन त्यातील रुम लोकांना विक्री करुन लोकांची फसवणूक केली Vasai Building Fraud आहे. अशी तक्रार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त,विशाखा मोटघरे यांनी 26 एप्रिल 2022 रोजी आचोळे पोलीस Achole Police Station ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सहाय्यक आयुक्ताच्या तक्रारीवरून भादवि कलम 420,34 एम.आर.टी.पी. ॲक्ट 52,53,54 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु यामधील आरोपी हा मागील दोन वर्षांपासून फरार होता. Vasai Virar Crime News

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी आढावा बैठकीत आर्थिक गुन्हे शाखेतील आरोपीला पकडण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे प्रभारी पोलीस निरीक्षक राहूल राख, मध्यवर्ती गुन्हे शाखा, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन बेंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर तावरे, पोलीस हवालदार प्रविण पवार, अनिल नागरे यांनी गुन्हयांचा समांतर तपास सुरु केला असता. आरोपी नरेंद्र ऊर्फ मुन्ना राजमनी सिंह,(व्यवसाय-बांधकाम व्यावसाईक व शाळा चालक रा. वसई लिंक रोड, नालासोपारा पूर्व) हा गुन्हा घडले पासुन आपले अस्तीत्व लपवुन राहत होता. आरोपीची गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषन करुन आरोपी हा मदर तेरेसा स्कूल पेल्हार व्हिलेज येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. बातमीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचेकडे केलेल्या प्राथमिक तपासामध्ये त्याचा गुन्हयात सहभाग असल्याचे आढळून आले असून त्याला पुढील कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. Vasai Virar Crime News

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेन्द्रे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहाय्यक फौजदार श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसिफ मूल्ला, संतोष चव्हाण, पोलीस हवालदार राजवीरसिंह संधु, प्रविण पवार, अनिल नागरे, महेश वेल्हे, शिवाजी पाटील, गोविद केन्द्रे, राजाराम काळे, संग्राम गायकवाड, हनुमंत सुर्यवंशी, संतोष मदने, अकिल सुतार, सतिश जगताप पोअं अंगद मुळे, नितीन राठोड, साकेत माघाडे यांनी केली आहे. Vasai Virar Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0