क्राईम न्यूज
Trending

Pune Crime News | धक्कादायक ! प्रेमाचा चहा करतोय बाल कामगाराचे शोषण : काळेपडल येथे गुन्हा दाखल

  • ट्रस्टच्या फिल्ड वर्करच्या तक्रारीवरून कारवाई

पुणे, दि. २१ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
| Pune Crime News

प्रेमाचा चहा पाजताना बाल कामगाराच शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हांडेवाडी चौकात उघडकीस आला आहे. ट्रस्टच्या फिल्ड वर्करच्या तक्रारीवरून कामगार उपआयुक्त याचेकडील धाड़ सत्र पथक व स्थानिक काळेपडल पोलिसांनी प्रेमाचा चहा दुकानावर कारवाई केली आहे. Pune Crime News

प्रेमाचा चहा दुकानाचे मालक नितीन हनुमंत होळकर, रा. होळकरवाडी यांच्याविरुद्ध बालकामगाराचे शोषण केल्याप्रकरणी काळेपडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी हे कम्युनिटी कमिटेड डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबई शाखा विश्रांतवाडी, पुणे या ठिकाणी फिल्ड वर्कर म्हणून काम करतात. ट्रस्टचे वतीने बालकामगार तसेच काळजी व संरक्षणाची आवश्यकता असणारे बालक यांचे बचाव कार्य तसेच बाल विवाह रोखणे इत्यादी कामे केली जातात. दिनांक 10/08/2025 रोजी मुंबईस्थित ट्रस्टचे ऑफिस येथे गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, पुणे शहरातील सर्वे नं. 1/2, हांडेवाडी चौक, डि- मार्ट समोर, सासवड-कात्रज रोड, हडपसर, पुणे येथील प्रेमाचा चहा या आस्थापनाचे मालक हे त्याचे दुकानात चौदा वर्षापेक्षा कमी बालकांकडुन काम करून घेत आहेत. Pune Crime News

फिर्यादी यांनी कामगार उपआयुक्त यांचे कार्यालय. शक्ती चेंबर्स, सर्वे नंबर 77/1,2 1,3 1,4 था मजला संगमवाडी पुणे येथे लेखी तक्रार दिली होती. दिनांक 19/08/2025 रोजी कामगार उपआयुक्त याचेकडील धाड़ सत्राचे दुकाने निरीक्षक राजेंद्र ताठे, दिपक पोळ, व श्रीमती अलका गवारी यांनी फिर्यादी यांना काळेपडळ पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील यांना धाडसत्रासाठी पोलीस बंदोबस्त स्थानिक पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार 9651 शुभम पवार, महिला पोलीस अंमलदार 232 पटाट, महिला पोलीस अंमलदार 704 गायकवाड तसेच अनैतिक मानवी वाहतुक विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर कडील महिला सहा. पोलीस फौजदार जाधव, महीला पोलीस हवा/7060 व्ही. एस. इंगळे यांच्या पथकासह दिनांक 19/08/2025 रोजी दुपारी 02.20 वा तक्रारीचे ठिकाणी सर्वे नं. 1/2, हांडेवाडी चौक, डि- मार्ट समोर, सासवड कात्रज रोड, हडपसर, पुणे येथील प्रेमाचा चहा या ठिकाणी छापा घातला असता तेथे बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले.

यावेळी पथकाने अधिक चौकशी केली असता बालकामगार गेल्या १५ दिवसांपासून महिना ९ हजार रुपये पगारावर काम करीत असल्याचे आढळून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0