Ulhasnagar Murder News : उल्हासनगरमध्ये खुनाचा प्रयत्न ; पूर्व वैमानस्यातून कोयत्याने डोक्यात आणि पाठीवर वार
Ulhasnagar Murder News : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार
उल्हासनगर :- पूर्ववैमानस्यातून आरोपीने एका व्यापाराच्या डोक्यावर हातावर आणि पाठीवर कोयत्याने वार करत गंभीरित्या जखमी केली आहे. आरोपीने जुन्या भांडणाचा राग काढत गंभीरित्या जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमुळे उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जखमी व्यक्तीच्या करंगळी बोट कापण्यात आला आहे. Ulhasnagar Crime News
गुरूवार (09 मे) दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास 39 सेक्शन साईबाबा मंदिर जवळील उल्हासनगर पाच या परिसरात व्यापारी चोखोबा लक्ष्मण जगताप यांच्यावर आरोपी मोहन काशिनाथ गायकवाड (28 वर्ष) याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने डोक्यात,मनगटावर, पंजावर, बोटांवर वार केले आहे. या घटनेनंतर चोकोबा यांचा मुलगा राहुल जगताप यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 307 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1),135 सह भारतीय हत्यार कायदा 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुण्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक खेरडे हे करत आहे.. Ulhasnagar Crime News