Ulhasnagar Crime News : घरामध्ये जबरी चोरी, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास

•Ulhasnagar Robbery News उल्हासनगरमध्ये घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण आठ लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला
उल्हासनगर :- उल्हासनगर-1 परिसरातील राजकुमार शंकर जाईकर (51 वर्ष) यांच्या घरात चोरी झाली आहे. घरफोडी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरामधील सोन्याचे-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. जवळपास आठ लाख 85 हजार ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. जाईकर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर-1 परिसरात राहणाऱ्या राजकुमार जाईकर यांच्या घराला 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट च्या दरम्यान लॉक होता. घरात कोण नसल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील मुख्य प्रवेशद्वाराचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण आठ लाख 85 हजार किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच जाईकर यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305(ए),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक यादव हे करत आहे तसेच फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.