मुंबई

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांचे दर्शन

Uddhav Thackeray Visit Mumbai Chatrapati Shivaji Maharaj Airport : राज्यात तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांचे जयंती साजरी केली जात आहे, याप्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

मुंबई :- राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून दोन शिवजयंती साजरी केली जात आहे. एक तारखेप्रमाणे अनेक तिथीप्रमाणे आज राज्यात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती साजरी केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आजची जयंती ही राज्यकार्यांकरिता एक पर्वाणीच आहे. सर्व पक्षांनी राज्यात तिथीप्रमाणे धूम धडाक्यात जयंती साजरी केली जात आहे. राज्यात सर्व शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आज आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांना वंदन केले आणि आशीर्वाद घेतला. यावेळी शिवसेना दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत राज्याचे विरोधी पक्ष नेते विधान परिषद अंबादास दानवे गुरुनाथ खोत भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेने राज्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी 17 उमेदवार रिंगणात उभे केले असून औरंगाबाद जागेवरून सध्या शिवसेनेत गटबाजी चालू आहे. औरंगाबाद जागेसकरिता राज्याचे विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादास दानवे हे इच्छुक असून त्यांच्या ऐवजी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेमध्ये नाराजीचे सूर उमटु लागले आहे. तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युती तोडल्याचे जाहीर केले असून यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सात जागे करिता जाहीर पाठिंबा देणार आहे. तर शिवसेनेच्या युतीबाबत अद्यापही कोणती स्पष्ट भूमिका दोन्ही गटाकडून आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0