क्राईम न्यूजपुणे

Pune Crime News | धक्कादायक : औंध येथे केबल टाकणाऱ्या कामगारांवर टोळक्याकडून कोयत्याने प्राणघातक हल्ला

  • Pune Crime News | युवक गंभीर जखमी

पुणे, दि. २८ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News | Pune Crime News | Shocking: Cable laying workers in Aundh attacked by gang with koyta gang attack

औंध येथील डी.पी. रोडवर (Aundh D.P.Road) रात्री उशिरा इंटरनेट केबल लाईन टाकणाऱ्या कामगारांवर टोळक्याकडून कोयत्याने (koyta gang attack) प्राणघातक हल्ला चढविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांकडून वारंवार कोयत्याचा वापर होत असल्याने पुण्यात कायदा सुव्यवस्था नावालाच उरली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar यांनी कडक उपाय योजना अंमलात आणून देखील गुन्हे घडत असल्याने ‘कायद्याचा धाक’ कमी झाल्याचा प्रत्यय येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज दि. २८ रोजी रात्री ३.३० दरम्यान फिर्यादी प्रकाश राठोड (कामगार) व त्याचे सहकारी नवीन राठोड, व्योमकेश चव्हाण, नितीन राठोड, अभिषेक चित्रा राठोड, मिथुन पवार हे इंटरनेट लाईनचे काम करत असताना ड्रॅगन चायनीज समोर, अमेय अपार्टमेंट, डी. पी. रोड औंध येथे आले असताना अचानकपणे टोळक्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला चढवला. यावेळी २० ते २२ वयोगटातील ४ ते ५ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत, लाथा बुक्यांनी मारहाण सुरु केली. यावेळी टोळक्यातील अनिकेत, ओम्म्या, प्रणव, श्लोक यांनी कामगारांना मारहाण करत असताना टोळक्यातील दोघांनी हातातील कोयत्याने अभिषेक राठोड याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर, उजव्या हातावर व पायावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्लयात अभिषेक राठोड हा गंभीर जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ -४ मगर, सपोआ आरती बनसोडे, चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वपोनि अजय कुलकर्णी, गुन्हे निरीक्षक युवराज नांद्रे, सपोनि राजकुमार केंद्रे, सपोनि नानासाहेब झरेकर, उपनि रुपेश चाळके यांनी घटना स्थळाला भेट दिली.

टोळक्यातील आरोपी अनिकेत, ओम्म्या, प्रणव, श्लोक यांचा चतुःशृंगी पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र मिरर (Maharashtra Mirror) प्रतिनिधी यांनी फिर्यादी प्रकाश राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, टोळक्यातील अनिकेत, ओम्म्या, प्रणव, श्लोक यांना काही वेळापूर्वी मारहाण झाली होती. त्यांनी आमच्यावर संशय घेत आम्हाला मारहाण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0