मुंबई

Uddhav Thackeray : आघाडी कोणतीही बिघाडी झाली नाही, कनेक्शन थोडेसे लूज आहे आम्ही सर्व एकत्र आहोत

•शिवसेना आणि मुंबईकर हे नाते घट्ट आहे असा विश्वास Uddhav Thackeray यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या विधान परिषदेच्या जागेवरून समझोता झाला आहे उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट

मुंबई :- शिवसेना आणि मुंबईकर हे नाते वेगळे आहे. ते नाते आणखी घट्ट करू, असा विश्वास Uddhav Thackeray यांनी व्यक्त केला. मुंबई पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवार अनिल परब यांच्या जाहीरनामाचे प्रकाशित उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस सोबत झालेल्या गैरसमजाबाबत देखील त्यांनी आपले मत स्पष्ट केले. काही प्रमाणात समन्वय झाला नव्हता. मात्र, आता सर्व ठीक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीमध्ये समजौता झाला आहे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक प्रक्रिया चालू असून 26 जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी पदावीधर मतदारसंघातील मतदार आहे. आणि माझे पदवीचे प्रमाणपत्र हे खरे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. अनिल परब यांच्या जाहिरनाम्याच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.तसेच“आघाडीत कोणताही बिघाड झालेला नाही, मात्र आमच्यातलं कनेकश्न थोडं लूज झालं होतं. आम्ही एकत्रच आहोत. कधीतरी संवाद झाला नाही तर काहीतरी गडबड होते. आमच्यात संवाद झाला नव्हता. लोकसभा निवडणुकीनंतर मी सात-आठ दिवस बाहेर होतो. दरम्यानच्या काळात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. अर्ज भरण्याची तारीख जवळ आली होती. त्यामुळे सर्वांनी आपापले उमेदवार जाहीर केले. आम्ही कोकण आणि नाशिकच्या जागेबाबत बाबत अग्रही आहोत. याबाबत काँग्रेसचं म्हणणं काय आहे ते दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मला फोन करून सांगितलं, संजय राऊत यांच्याशी देखील त्यांचं बोलणं झालं आहे. जागांबाबत आमच्यात सर्वकाही ठरलं आहे. आम्ही काय ठरवलंय ते थोड्याच वेळात तुमच्यासमोर जाहीर करू. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी इथे नव्हतो. अशातच उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ हातची जाऊ नये म्हणून आम्ही चारही जागांवर अर्ज भरले हे खरं आहे. मात्र आता आम्ही चर्चा करून काही वेगळे निर्णय घेतले आहेत. थोड्याच वेळात ते जाहीर केले जातील.”

वर्षभर नंतर राष्ट्रीय सेवा संघाकडे मणिपूर मधील हिंसाचाराची माहिती पोहोचली आहे. त्यांची संदेश यंत्रणा इतकी सक्षम आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आता मोहन भागवत यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे आता तरी नरेंद्र मोदी तेथे जाणार आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. भाजपला संघाची आता गरज राहिली नाही, असे दिसत आहे. त्यामुळे मोहन भागवत यांचे तरी नरेंद्र मोदी ऐकणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाकडे आता तरी तुम्ही लक्ष देणार आहात का की केवळ तुमचे ढोल वाजत राहणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0