•आदित्य ठाकरे, अनिल देसाईंसह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती; राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनीही वाहिली मानवंदना
मुंबई/दादर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील चैत्यभूमीवर त्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, आमदार सुनिल शिंदे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव आणि इतर अनेक पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार गटाचे नेतेही उपस्थित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) नेतेही उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही चैत्यभूमीवर महामानवाला मानवंदना दिली.
6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो अनुयायांच्या साक्षीने विविध पक्षांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…