Uddhav Thackeray Party : 11 जागांवर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीविरोधात उद्धव ठाकरेंचा पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार का?
Uddhav Thackeray Party On Legislative Council Election : विधानसभा निवडणुकीपूर्वी 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. आता या प्रकरणी उद्धव ठाकरेंची शिवसेना (ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते.
मुंबई :- विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला Legislative Council Election स्थगिती देण्यासाठी उद्धव ठाकरेंची Uddhav Thackeray शिवसेना (ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात High Court जाऊ शकते. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभाध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना विधान परिषदेची निवडणूक घेणे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करू शकते.
आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयातही खटला सुरू असून, आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होऊ शकतो. त्यामुळे या आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणणे घटनाबाह्य असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात म्हणाले होते.
शिवसेना फुटी नंतर पात्र पात्रतेच्या निर्णयाबाबत अद्यापही सुप्रीम कोर्टात केस चालू असून येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पात्र पात्र त्याच्या भौऱ्यात अडकलेल्या आमदार मतदान कसे करू शकतात असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्या संदर्भात आज ठाकरे गटाकडून तज्ञ वकिलांच्या माध्यमातून बैठक घेतली जाणार असल्याची चर्चा म्हटली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जायची तयारी सुरू आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी ही घोषणा केली. विधान परिषदेच्या 11 जागेच्या आमदाराना विधानसभेच्या सदस्यांनी (आमदार) निवडून दिलेल्या 11 विधान परिषद सदस्यांचा (MLCs) सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे.