Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या दौऱ्यावर, शाहू महाराजांची घेणार भेट
Uddhav Thackeray Meet Shau Maharaj : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज ते छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार आहे.
कोल्हापूर :- कोल्हापूरच्या जागेवर ठाकरेंचा Uddhav Thackeray दावा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून शाहू महाराज यांचे नाव निश्चित झाले आहे. त्याला आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी पाठिंबा दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election 2024 शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्याने कोल्हापूरसाठी ठाकरे यांनी या जागेवर दावा सांगितला होता. मात्र, शिवसेनेतून निवडून आलेले संजय मंडलिक राज्यातील सत्तासंघर्षातील नाट्यात शिंदे गटात सहभागी झाले. ठाकरे Uddhav Thackeray गटाची साथ सोडलेल्या मंडलिक यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचा चंग ठाकरे गटाने बांधला आहे. यामुळे शाहू महाराज यांच्या नावाला पसंती देत ही जागा शिवसेनेने काँग्रेसला दिली आहे.
कोल्हापूरच्या जागेबाबत समन्वय दरम्यान, कोल्हापूरच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी प्रारंभीपासून समन्वयाची भूमिका ठेवली आहे. यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात आतापर्यंत एकत्रित काम करताना दिसत आहे. एकसंधपणे आणि ताकदीने कोल्हापूरची निवडणूक लढवण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गुरुवारी शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या प्रचाराला आणखी वेग येईल, असे सांगण्यात आले.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गुरुवारी शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे, या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शाहू महाराज यांच्यात होणारी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तर यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
आज दुपारी साडेचार वाजता ठाकरे यांचे विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर ठाकरे मिरजला रवाना होतील. मिरज येथून रात्री उशिरा ते कोल्हापूर विमानतळावरून मुंबईला रवाना होणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आदींसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.