Uddhav Thackeray Group On Shinde Group : गोविंदाच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाला खोचक सवाल
•Uddhav Thackeray Speaks On Shinde Gat मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अभिनेता गोविंदा यांनी पक्ष प्रवेश केला, पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाकडून गोविंदा संदर्भातील काही गोष्टी आठवण करून दिल्या
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिने अभिनेता गोविंदा यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश करून घेतला. या पक्षप्रवेशाला जर ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित करत एक खोचक पोस्ट शेअर केली आहे.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गुरुवारी सायंकाळी प्रवेश केला. गोविंदा सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मुंबईतील शिवसेना कार्यालयात पोहोचले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. पक्ष प्रवेशानंतर गोविंदा म्हणाले की, मी 2004 ते 2009 या काळात राजकारणात होतो. 14 वर्षांनंतर मी पुन्हा राजकारणात आलो हा योगायोग आहे. माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मी पूर्ण करेन”.
गोविंदावर भाजपाने आरोप केले
ठाकरे गटाने ट्विटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाने एका जुन्या बातमीचा हवाला देत गोविंदाच्या पक्षप्रवेशावरून टिपण्णी केली आहे. ज्या गोविंदावर भाजपाने ‘दाऊदची मदत’ घेतल्याचे आरोप केले होते, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपाला नक्की विचारलंय ना? असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
गोविंदाने 2004 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघात भाजप नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्या पराभवनानंतर राम नाईक यांनी म्हटलं होतं की, गोविंदाने त्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यावसायिक हितेन ठाकूर यांची मदत घेतली होती. याच जुन्या बातमीचा हवाला देत ठाकरे गटाने हे खोचक भाष्य केले आहे.
गोविंदा केवळ पक्षाच्या प्रचारासाठी काम करणार पक्ष प्रवेशानंतर गोविंदाला शिवसेनेकडून मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात आहे. परंतु, एकनाथ शिंदे आणि गोविंदाने या खोट्या अफवा असल्याचे म्हटले आहे. गोविंदा सध्या केवळ पक्षासाठी आणि आगामी निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी काम करेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.